आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील एमआयटी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा वर्धापन दिन महाविद्यालयीन सेवेत ५ व १० वर्ष सेवा पूर्ण केलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचा-यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आले. यामध्ये प्रा. दीक्षा कदम, प्रा. राहुल बाराथे, प्रा कविता महाजन. प्रा अनिकेत नागणे, निलेश मते यांनी महाविद्यालयात काम करीत असताना आलेले अनुभव सांगत आपल्या जीवनात महाविद्यालया मुळे काय बदल झाले याचे विवेचन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी .बी. वाफारे यांनी महाविद्यालयाने ३.२१ सीजीपीए गुण मिळवत ‘अ’ श्रेणी मिळाली. याबद्दल शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. महाविद्यालयाची जडणघडण कशी झाली व सद्यस्थिती काय आहे या बदल माहिती दिली.
२००७ साली १७ मुलांपासून महाविद्यालयची सुरवात झाली. सुरुवातीला बी बी.ए. व बी सी ए. हे दोन अभ्यासक्रम सुरु करण्यात आले. आज मितीला महाविद्यालयत २००० हून अधिक विध्यार्थी शिक्षन घेत आहेत, १३१ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग कार्यरत आहे . ७ पदवी अभ्यासक्रम व ५ पदवीत्तर अभ्यासक्रम शिकविले जातात. बी बी.ए , बी बी.ए (काँम्पुटर अँप्लिकेशन) , बी बी.ए (इंटरनॅशनल बिझनेस), बी. कॉम , बी.एस.सी (संगणकशास्त्र ), बी सी ए (शास्त्र) , बी.एस.सी (अनिमेशन) व एम एस .सी (संगणकशास्त्र) , एम.कॉम, एमएस.सी (इंडस्ट्रियल मॅथेमॅटिक्स विथ कॉम्पुटर अँप्लिकेशन) एम.ए (मास कम्युनिकेशन अँड जॉर्नलिसम) असे एकूण १२ अभ्यासक्रम महाविद्यालयात शिकविले जातात. या अभ्यासक्रमास खेड,आळंदी व पिंपरी चिंचवड परीसरातील विद्यार्थी प्रवेश घेतात. महाविद्यालयातील माजी विध्यार्थी विविध शासकीय, आय. टी. कंपनी आहेत. दरवर्षी ५०० + विध्यार्थीची महाविद्यालया मार्फत प्लेसमेंट करण्यात येत असल्याचे प्रा. वाफारे यांनी सांगितले.
या कार्यक्रमास प्रकल्प संचालक विजय खोडे, संत ज्ञानेश्वर अध्यापक महाविद्यालयाचे प्रचार्य डॉ. सुरेंद्र होळकर, जुनियर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कुंभार, उपप्राचार्य प्रा.अक्षदा कुलकर्णी, डॉ. मानसी अतितकर, विविध विभागांचे विभाग प्रमुख, महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयातील मानव संसाधन विभाग प्रमुख रेश्मा सोमवंशी, मनमत अडसूळ आदींनी केले. सूत्रसंचालन प्रा. अर्चना आहेर यांनी केले. आभार प्रा. मयूरी बापट यांनी मानले.