आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : महाराष्ट्र शासन, महसुल विभाग अंकित पिंपरी चिंचवड अपर तहसील कार्यालयाचे वतीने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत होत असून सोमवारी ( दि. १९ ) वडमुखवाडीत अभियान राबविण्यात आले. वडमुखवाडी परिसरातील नागरिकांचे सोयीसाठी आयोजन करण्यात आले होते. पंचक्रोशीतील नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतल्याचे अपर तहसीलदार गीता गायकवाड यांनी सांगितले. या सेवा पंधरवड्यात जिल्ह्यात विविध ठिकाणी आपले सरकार पोर्टल, सेवा हमी कायदा अंतर्गत येणाऱ्या सर्व सेवा, सनद वाटप ( ४२ कलम बाबत ) , उत्पन्नाचा दाखला, ७/१२ वाटप, आदेश वाटप, संजय गांधी योजने अंतर्गत येणारे दाखले, फेरफार निर्गती व वाटप अशा सेवांचा समावेश होता.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत विविध उपक्रमाचे आयोजन पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे मार्गदर्शनात होत आहे. यासाठी हवेली उपविभागीय अधिकारीसंजय असवले, पिंपरी चिंचवड अपर तहसिलदार गीता गायकवाड, निवासी नायब तहसिलदार प्रविण डमाले, रश्मी गालपेल्ली, जयश्री कवडे यांचेसह महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेत आहेत. स्थानिक नागरिक,पदाधिकारी यांनी यावेळी सहकार्य केले. वडमुखवाडी येथील चंद्रफुल गार्डन ( गोखलेमळा शेजारी ) येथे आयोजित कार्यक्रमास नागरिकांनी मोठं प्रतिसाद दिला. यात विविध सेवा सुविधांचे दाखले वाटप करण्यात असल्याचे वैष्णवी फाऊंडेशनचे अध्यक्ष अमित तापकीर यांनी सांगितले. जास्तीत जास्त नागरिक गरजूंनी उपक्रमाचे कालावधीत नागरिकांनी सेवा सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन पिंपरी चिंचवडच्या अपर तहसीलदार गीता गायकवाड यांनी केले.