आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : वडमुखवाडी येथील श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात ग्रंथराज ज्ञानेश्वरी जयंती निमित्त ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यात ह.भ.प. चंद्रकांत महाराज खेडकर यांची सुश्राव्य कीर्तन सेवा होऊन तिसऱ्या वर्षीचे जयंती सोहळ्यात हरिनाम गजरात सांगता झाली. यावेळी श्रींची पूजा व आरती थोरल्या पादुका मंदिर ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर यांचे हस्ते झाली.
मंदिरातील प्रथा परंपरांचे पालन करीत ग्रंथराज ज्ञानेश्वरी जयंती विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. या वेळी ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे नेतृत्व चंद्रकांत महाराज खेडकर यांनी केले. विविध धार्मिक कार्यक्रमात पहाटे काकडा, आरती , दुपारी भजन, नित्य नेमाने हरिपाठ, ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पारायण व संध्याकाळी श्रींची माऊलींची आणि श्री पांडुरंगरायांची आरती नंतर भाविकांना श्रींचे दर्शन व्यवस्था करण्यात आली होती.
प्रथापरंपरांचे पालन करीत विविध धार्मिक कार्यक्रम ग्रंथराज ज्ञानेश्वरी जयंती निमित्त हरिनाम गजरात झाले. यावेळी ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर यांच्या हस्ते कीर्तनकार व मान्यवरांचा सत्कार शाल, श्रीफळ, उपरणे देऊन करण्यात आला. यावेळी ग्रंथराज ज्ञानेश्वरी ग्रंथाची दिंडी मिरवणूक हरिनाम गजरात झाली. भाविक भक्त नागरिकांना याप्रसंगी तुकारामबुवा तापकीर यांचे वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी खजिनदार दत्तात्रय गायकवाड, मनोहर भोसले, विश्वस्त बाळासाहेब तापकीर, ह.भ.प. रमेश महाराज घोंगडे, राजेंद्र नाणेकर, साहेबराव काशीद, शांताराम तापकीर, माळवे महाराज आदी मान्यवर उपस्थित होते.