Breaking newsWorld update

चित्ता इज बॅक!

कुनो (मध्यप्रदेश) – माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी २००८-२००९ मध्ये हाती घेतलेल्या ‘प्रोजेक्ट चित्ता’ या प्रकल्पाची यशस्वी सांगता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते आज झाली. डॉ. सिंग यांनी भारतीय चित्ता परत आणण्याचा निर्धार केला होता. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या प्रोजेक्टला स्थगिती दिली होती. २०२० मध्ये ही स्थगिती उठल्यानंतर, विद्यमान पंतप्रधान मोदी यांनी भारताने १९५२ मध्ये देशातून चित्ते नामशेष झाल्याची केलेली घोषणा बदलवली आणि आज मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय अभयारण्यात नामबियातून आणलेले ८ चित्ते सोडले. या चित्त्यांनी भारतात पाऊल ठेवल्याचे खास क्षण यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कॅमेर्‍यात टिपले. तसेच, आजचा दिवस देशासाठी ऐतिहासिक असल्याचेही ते म्हणाले.

नामबियावरून आठ चित्ते घेऊन आलेले विशेष विमान आज मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर शहरात उतरले. त्यानंतर हे चित्ते हवाई दलाच्या चिनूक हेलिकॉप्टरने मध्यप्रदेशातील श्यापूर जिल्ह्यातील कुनो राष्ट्रीय अभयारण्यात आणण्यात आले. या अभयारण्यात या आठ चित्त्यांसाठी विशेष अधिवास तयार करण्यात आलेला आहे. नामबियातून आल्याने त्यांना काहीकाळ क्वारंटाईन ठेवण्यात आले आहे. या आठ जणांमध्ये पाच मादी व तीन नर चित्त्यांचा समावेश आहे.
—————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!