वैजापूर (तालुका प्रतिनिधी) – राखीव वनक्षेत्रातून मुरूम व मातीची चोरी करणार्या दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैजापूर वनपरिक्षेत्र कार्यालयाने शनिवारी दिवशी शिवारात ही कारवाई केली.
दिवशी शिवारातील वनविभागाच्या जमिनीतून मुरूम व मातीची चोरी होत असल्याची माहिती वन अधिकार्यांना मिळाली. त्या आधारे आरोपींना ताब्यात घेऊन त्यांचे ताब्यातील टॅ्रक्टर (एमएच २० सीआर २०५५) जप्त करण्यात आला आहे. उपवनसंरक्षक सूर्यकांत मंकावार, सहाय्यक वनसंरक्षक सचिन शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर कवठे, वन परिमंडळ अधिकारी प्रा.दिलीप टेरके, वनरक्षक नारायण चाथे, दिलीप सूर्यवंशी यांनी ही कारवाई केली. या प्रकरणी सागर बाबासाहेब शेलार (२२), प्रविण आसाराम थोरात (२०) रा.जांभळा या दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.