Chikhali

मेरा बुद्रूकच्या आजी-माजी सरपंच व पदाधिकार्‍यांचे अंतर्गत वाद चव्हाट्यावर!

– नेत्यांचा हस्तक्षेप, बळीचा बकरा कोण?

मेरा बुद्रूक, ता. चिखली (प्रताप मोरे) – ग्रामपंचायत निवडणुकीमुळे गेल्या दोन वर्षापासून सत्ता संघर्षात एकमेकांमध्ये अंतर्गत वाद नेहमीच चव्हाट्यावर येत असल्यामुळे त्यांचे पडसाद नालीच्या सांडपाण्याच्या क्षुल्लक कारणावरून समोर आले आणि ग्रामपंचायतीच्या आजी माजी सरपंच व पदाधिकार्‍यांनी दिनांक ६ व ७ सप्टेंबररोजी एकमेकांविरुध्द विनयभंगाच्या तक्रारी पोलिस ठाण्यात दिल्या. दोन्ही तक्रारीवरून अंढेरा ठाणेदार यांनी विनयभंगासह विविध कलमाद्वारे गुन्हे दाखल केले आहे. मात्र या राजकीय षडयंत्र प्रकरणात नेते मंडळी बळीचा बकरा कोणाला बनविणार, याकडे सर्वाचे लक्ष वेधले गेले असल्याने गावकर्‍यामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना मेरा बु येथे घडली.

चिखली तालुक्यातील मेरा बुद्रूक ग्रामपंचायत ही सर्वात मोठी असल्याने सदस्य संख्या १३ आहे. या ग्रामंचायतची सार्वत्रिक निवडणुक ११ फेब्रुवारी २०२१ मध्ये अटीतटीच्या संघर्षात पार पडली. त्यामध्यें सरपंचपदाच्या निवडणुकीत गुप्त मतदानद्वारे सौ. अनिताताई लक्ष्मण वायाळ यांनी सौ. रेणुका खुशालराव पडघान यांचा पराभव करून विजय मिळविला. त्यामुळे गावात आणखी राजकीय गरमागरमीचे वातावरण निर्माण झाल्याने २७ फेब्रुवारी रोजी झालेल्या जिल्हा विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची निवडणूकीत ग्रामपंचायत निवडणुकीचा वचपा काढत ग्रामविकास पॅनलचा धुव्वा उडवित शेतकरी ग्रामविकास पॅनलने विजय मिळविला. हा एकमेकातील सत्ता संघर्षाचा सामना दोन वर्षापासून सुरूच असल्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील नालीच्या घाणपाण्यावरून एकमेकांत २ सप्टेंबररोजी वाद उफाळला आणि वादाचे रूपातंर विनयभंगाच्या तक्रारीमध्ये उघडकीस आले. त्यामध्ये दिनांक ६ सप्टेंबर रोजी सरपंच सौ. अनिताताई वायाळ यांनी दिलेल्या तक्रारी मध्ये म्हंटले की उपसरपंच तथा सदस्य आम्ही गावातील नालीच्या सांडपाण्याचे नियोजन करीत असताना त्रास देण्याच्या उद्देशाने माजी सरपंच पती सुनिल पडघान, अनंथा पडघान व इतर जणांनी येवून अश्लिल भाषेत शिवीगाळ करून म्हंटले की उपर्‍या भोकाच्या हो इतक्या दिवस झोपले होते का आज नालीचे काम करित आहात. पूर्ण पावसाळा संपल्यावर तुम्हाला आज नालीचे पाणी काढण्यासाठी जाग आली आहे का? त्यावेळी त्यांना म्हटले की, शिविगाळ करू नका. आम्ही पावसाळा सुरू होण्यापूर्वी नाली चे काम पूर्ण केलेले आहे, असे म्हणत असताना अनंता शामराव पडघान याने अश्लील भाषेत शिवीगाळ करून वाईट उद्देशाने हात धरून जवळ ओढले आणि माजी सरपंच सुनिल माधवराव पडघान याने लोटपाट करून जिवाने मारण्याची धमकी दिली. अशा सरपंच महिलेच्या तक्रारीवरून ठाणेदार गणेश हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाँ शैलेश जाधव यांनी आरोपी माजी सरपंच पती सुनील माधवराव पडघान, अनंता शामराव पडघान यांच्या विरुद्ध अप क्र – २७०/२०२२ कलम ३५४, २९४, ३२३, ५०६,३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.

तर दुसरीकडे सौ. स्वाती अनंता पडघान यांची तक्रारीमध्ये नमूद आहे की घरात एकटी असताना गजानन वायाळ यांने घराचे लोखंडी गेट तोडले व सर्वजण घरात आले आणि जवळ येऊन म्हणाले की तुझ्या नवर्‍याची वाट लावली आता तुला घोडा लावतो. छिनालचे तुम्ही जास्त माजले, तुझा उरावर बसवून जिरवतो, असे म्हणत वाईट उद्देशाने हात धरून जवळ ओढून छेडछाड केली. आणि सरपंच पती लक्ष्मण निंबाजी वायाळ व सरपंच सौ. अनिता लक्ष्मण वायाळ यांनी लथाबुक्यांनी मारहाण करत केस धरून ओढले. सर्वांनी अश्लील शिवीगाळ करून जिवाने मारण्याची धमकी देत होते. तेव्हा आरडाओरडा केला असता पुरुषोत्तम वामनराव पडघान व दत्तात्रय नारायण पडघान यांनी त्यांच्या तावडीतून सोडविले. अशा तक्रारी वरून पोलिसांनी आरोपी गजानन संतोष वायाळ, म. सत्तार म. हयात, लक्ष्मण निंबाजी वायाळ, अनिता लक्ष्मण वायाळ, परशराम यादवराव पडघान सर्व रा. मेरा बु. यांच्याविरुद्ध अप क्र – २७१/२२ कलम ३५४,२९४, ३२३, ५०६, १४३, ४५३ भादंविनुसार गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणाचा तपास पोकॉ भरत पोफळे यांच्याकडे सोपावला आहे. मात्र या राजकीय षडयंत्राच्या प्रकरणात नेते मंडळी बळीचा बकरा कोणाला बनविणार, याकडे सर्वाचे लक्ष वेधले गेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!