– शिवलाल जंजाळ व रामा लाहुडकार यांच्याविरोधात गुन्हे दाखल
खामगाव (तालुका प्रतिनिधी) – भारत-पाकिस्तानच्या टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यावर सुरु असलेल्या सट्ट्यावर छापा टाकून, पोलिसांनी सट्टा खेळविणारे रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. मुख्य सट्टेबाज हा लासुरा येथे बसून आशिया कप चषकातील सामन्यांवर ऑनलाईन सट्टा घेत होता. अप्पर पोलिस अधीक्षकांच्या पथकाने मारलेल्या छाप्यात मुद्देमालासह दोघा जणांना अटक करण्यात आली आहे.
सविस्तर असे, की काल (दि.२८) रोजी मुख्य हवालदार गजानन बोरसे यांना गोपनीय माहिती मिळाली की, खामगांव शहरातील मोठा क्रिकेट सट्टा चालविणारा सटोडी हा लासुरा येथे बसून आशिया कपमधील भारतविरुद्ध पाकिस्तान मध्ये असलेल्या टी -२० क्रिकेट सामन्यावर मोबाईलद्वारे सट्ट लाईन घेऊन लोकांना मोबाईलवरून भाव देऊन पैश्याचे हारजीतवर मोबाईलचे साह्याने क्रिकेट सट्टा खेळत आहे. यावरून सापळा रचून पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी लसुरा येथे जाऊन शिवलाल जवंजाळ याचे घराममधील एका रूममध्ये सुरू असलेल्या क्रिकेट सट्ट्यावर छापा टाकून रामा लाहुडकार रा. गोपलानगर, खामगाव याचे कब्जातून एक अॅण्ड्रॉईड मोबाईल फोन व चार साधे मोबाईल, एक हिशोबची चिट्ठी व इतर साहित्य या प्रमाणे १६ हजार ६०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जागा मालक शिवलाल जवंजाळ व रामा लाहुडकार यांच्याविरुद्ध शेगांव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कार्यवाही पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक खामगांव यांच्या आदेशाने, पोलिस उपनिरीक्षक पंकज सपकाळे, पोहेकॉ. गजानन बोरसे, नापोकॉ. संदिप टकसाळ, पोकॉ. राम धामोड़े, महिला पोकॉ अनिता गायकी यांनी केली आहे. अपर पोलीस अधीक्षक श्रावण दत्त यांचे पथकांनी या अगोदरसुद्धा खामगाव शहरातील क्रिकेट बुकी चालवणार्या इसमावर कारवाई केली होती. पथकाच्या धाकाने चोरून लपून शहर सोडून बाहेर बसणार्या सटोडी वरसुद्धा या पथकाने आता कारवाई केली आहे.