चिखली (तालुका प्रतिनिधी) : स्थानिक श्री शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालय चिखली येथे हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्ताने राष्ट्रीय खेळ दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये संगीत खुर्ची, कबड्डी, रनींग 400 मी व 800 मी तसेच क्रिकेट , टेबल टेनिस ई. स्पर्धा घेऊन विध्यार्थाचा उत्साह वाढविण्यात आला.
सर्वच स्पर्धेत महाविद्यालयातील जुनिअर व सिनियर च्या मुलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. सदर राष्ट्रीय खेळ दिवस स्पर्धेचे आयोजन महाविद्यालचे विद्यार्थीप्रिय प्राचार्य डॉ.ओमराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले हाेते. स्पर्धेचे उदघाट्न महाविद्यालतील ज्येष्ठ प्राध्यापक डॉ.बोबडे सर यांनी केले. सदर कार्यक्रमांसाठी डॉ.गवई सर,प्रा.चिंचोले सर,प्रा.उन्हाळे सर,प्रा.राम पवार,प्रा.चिखले मॅडम,चव्हाण मॅडम,वैद्य मॅडम,प्रा.सतीश काळे इतर सर्वच मान्यवर उपस्थित होते . डॉ.बोबडे सरांनी विद्यार्थ्यांना खेळाचे जीवनातील महत्त्व सांगून मार्गदर्शन केले. प्रा.शशिकांत पाटील यांनी सूत्रसंचालन करून शरीरिक् शिक्षक प्रा.कोकोडे सर यांनी आभार प्रदर्शन केले.