MaharashtraMarathwada

महापारेषणच्या अधिकाऱ्यांनी झाडांना पाणी घालण्यासाठी लढविली अनोखी शक्कल!

पाचोड/विजय चिडे
उन्हाळ्यात झाडांना पाणी घालण्यासाठी एक ४००केव्ही उपकेंद्र थांपटी तांडा ता.पैठण येथील महापारेषणच्या अधिकाऱ्यांनी अनोखी शक्कल लढविली आहे. येथील अधिकाऱ्यांनी टाकाऊ जारचा उपयोग हा चक्क झाडाला पाणी देण्यासाठी केला. हे उपकरण वृक्ष संवर्धनासाठी जगविण्यासाठी तसेच दुष्काळी भागासाठी ‘स्वस्तात मस्त’ उपाय ठरू शकतो असे अधिकाऱ्यांनी “ब्रेकिंग महाराष्ट्रशी’ बोलतांना म्हटले आहे.

थांपटी तांडायेथील ४०० केव्ही उपकेंद्र महापारेषण विभागाने त्यांच्या परिसरात तीन वर्षापूर्वी वेगवेगळ्या झाडाची लागवड करण्यात आली. मात्र, येथील जमीन अतिशय खडकाळ असल्याने ते झाडे वाचविण्यासाठी येथील अधिकारी हे झाडे जगविण्यासाठी मोठे पर्यंत करत असल्याचे येथे पाहावयास मिळत आहे. येथील अधिकाऱ्यांनी घरात पाणी वाटप करण्यात येणाऱ्या खराब जारचा उपयोग चक्क त्यांची कमी खर्चात खरेदी करून त्यातून पाण्याची बचत झालेली असून, परिसरातील झाडे संपूर्ण हिरवेगार दिसत आहे.

महापारेषण विभागातील अतिरिक्त कार्यकारी अंभियता किरण वाणी यांनी शंभर झाडाची लागवड केली. मात्र येथे ठिबक सिंचन ऐवजी त्यांनी एक अनोखी शकल लढविली आहे. वाणी यांनी औरंगाबादहून एक ठिकाणाहून जारचे खराब झालेले डब्बे ५० रूपये प्रति नग असे ९० डब्बे खरेदी करुन ते जारचे डब्बे परिसरात लावण्यात आलेल्या प्रत्येक झाडाजवळ एक डब्बा ठेवला आणी त्या जारच्या डब्यात एकदिवसा आड ट्रँक्टरव्दारे भरून झाडांना थेंबथेंब पाणी सुरू करून दिली तर हा जार तीन ते चार दिवस पाणी राहते, तर येत्या पंधरा दिवसात थांपटी तांडा येथील ४००केव्ही महापारेषण विभागात पुन्हा दोनशे झाडाची लागवड करण्यात येणार असून त्यांनीही या झाडा प्रमाणेच जोपासना करण्यात येणार आहे.

हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी अति.कार्यकारी अंभियता गिरीष देशपांडे, अविनाश जोशी, जयंत म्हस्के, प्रविण महाजन, श्रीनिवास कुरूक्ल, उप कार्यकारी अभियंता सुभाष भावले, फहीम शेख, ऋषीकेश कुलकर्णी, सहाय्यक अभियंता आकाश शेळके, भागवत पानझडे या सर्वांनी हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी मोठे पर्यंन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!