Breaking newsCrimeHead linesMaharashtraVidharbha

जुगारावर छापा : ५४ जुगारी पोलिसांच्या जाळ्यात

बुलडाणा – (जिल्हा प्रतिनिधी)  देऊळगावराजा शहरातील जालना मार्गावर एका जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी ५४ जुगाऱ्यांना एक्का बादशहा नावाचा जुगार ताश पत्त्यावर हार जीत खेळत असताना ताब्यात घेतले. सदर छापा 13 जून सोमवारी सायंकाळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक खामगाव यांच्या पथकाने मारला . यामध्ये रोख १७ लाख,५६ मोबाईल,एक चारचाकी, दुचाकी असा एकूण ४० लाख ७१ हजार ३८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार जालना मार्गावरील चैत्रबन हॉटेल मागे असलेल्या टिल्लू वाईन बारच्या बाजूच्या टिन शेड मध्ये एक्का बादशहा जुगार सुरु असल्याची माहिती मिळाली असता अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांना मिळाली यावरून एएसपी यांच्या पथकाने सोमवारी 13 जून रोजी सायंकाळी सापळा रचून सदर ठिकाणी छापा मारला असता ५४ जुगारी एक्का बादशहा नावाचा जुगार खेळताना आढळून आले. त्यांना एक पोलीस व्हॅन व तीन क्रुझर मध्ये ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

त्यांच्याकडून रोख १७ लाख १० हजार ९५८ रुपये,५२ ताशपत्ते,५६ मोबाईल एक कार व ११ दुचाकी असा एकूण ४० लाख ,७१ हजार ३८ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला सदर कारवाई रात्री दीड वाजेपर्यंत सुरू होती. यावेळी पोलिसांनी श्याम देशमाने रा. चिखली, दिनकर उगले रा. पेठ, अरूण खेडेकर रा. बुलडाणा, इब्राहीम अब्दुल चौस रा. जालना, नंदकिशोर लंबे रा. सारडा ता.सिं. राजा, शेख जाकीर शेख बशीर रा. वळती, रविंद्र पवार दे.राजा, रत्नाकर सुरोशे दे. राजा, शिवशंकर गायकवाड चिखली, साहेबराव शिवरकर दे.राजा, सौरभ शिणगारे जालना, शिवाजी शिंगणे रा.गारखेड ता.दे.राजा, संतोष सपाटे दे.राजा , कैलास गट रा. शेलू तस्कुर ता.चिखली, अक्षय पानझगे रा. जालना, पंढरी ढगे रा. बिबी ता. लोणार, सिध्दांन्त खांडेभराड रा. दे. राजा, शंकर शिवरकर रा. दे.राजा, दिनेश व्यवहारे रा.सिं.राजा, शफीक खान करीम खान चिखली, मंगेश इंगळे रा. शेलुद ता.चिखली, महादु हाडंगे रा. वरूड ता. जाफ्राबाद, शेख फहीम शेख सलीम रा. अमडापूर ता.चिखली, सुनिल बर्डे रा. बुलडाणा, रामेश्वर डोईफोडे रा. जालना, राजेंद्र जगताप रा. निवडुंगा ता. जाफ्राबाद, राजु लोखंडे दे. राजा, उमेश देशमुख बुलडाणा, किशोर कुयटे रा. चिखली, निलेश दराळे परभणी, अश्रुबा कदम आर्वी, विष्णु कापडे रा. बोरगाव काकडे, संजय पडघाण मेरा बु. ता. चिखली , प्रभाकर दंदाले रा.गव्हाण ता.दे.राजा, मजीद खान अजीस खान दे.राजा, शेख आसीफ शेख मेहताब रा.दिग्रस ता. दे. राजा, शेख हमीद शेख करीब चिखली, मोहसीम खान अब्बास खान दे.राजा , कल्याण सपकाळे रा. कवडा ता. चिखली, विशाल फुलारे रा. दे.राजा, हैदर शाह हसन शाह दे.राजा, दत्त शिंदे पळसखेड, हनुमान अवसारे रा. वरूड ता. जाफ्राबाद, शेख कदीर शेख लाल रा. सिं.राजा, विनायक साबळे रा. गांगलगाव ता. चिखली, गोपी राजपूत रा. जालना , गणेश शिंदे जालना, शिवानंद जायभाये रा. दगडवाडी ता . दे. राजा, बिरजु घोडके रा. जालना, अमोल खराडे रा. सिं.राजा रावसाहेब तायडे रा. निवडुंगा ता. जाफ्राबाद, श्रीकृष्ण जाधव रा. चिखली, परमेश्वर लोखंडे दे.घुबे यांना अटक करून त्यांच्याविरूध्द पीएसआय सपकाळे यांच्या फिर्यादीवरून दे.राजा पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!