Breaking newsMaharashtraVidharbha

शेगाव रेल्वेस्थानकावर मालगाडी रूळावरून घसरली

बुलडाणा (जिल्हा प्रतिनिधी) – शेगाव येथील रेल्वेस्थानकावर 14 जून रोजी सकाळी 11 वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक २ डाऊन रेल्वे मार्गावर भुसावळ कडून बडनेराकडे जात असलेली मालगाडीची शेवटची गार्ड बोगी जवळील एका बोगीचे चारही चाक रुळावरून घसरले.

सदर घटना तत्काळ लक्षात येताच शेगाव रेल्वे स्टेशन प्रबंधक पी एम पुंडकर, परिवहन निरीक्षक मोहन देशपांडे,आरपीएफ शेगावचे एपीआय डॉ विजय साळवे यांनी तत्काळ इतर कर्मचऱ्यांसोबत घटनास्थळी पोहोचले व जलदगतीने याबाबत कार्यवाही करत डाऊन मार्गावरील प्रवासी रेल्वे गाड्यांना प्रवासात कोणताही अडथळा होणार नाही याची दक्षता घेतली .
मंगळवार १४ जून रोजी सकाळी ११.५९ वा. दरम्यान एक मालगाडी भुसावळ येथून शेगाव मार्गे बडनेरा कडे डाऊन रेल्वे लाईन वरुन जात होती शेगाव रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक दोन च्या बाजूला लूपलाइन क्रमांक २ रुळावरून या मालगाडीचा ऐका बोगीचे चारचाक रूळा वरून घसरले होते.
शेगाव रेल्वे स्टेशनचे परिवहन निरीक्षक मोहन देशपांडे यांनी तसेच शेगाव रेल्वे स्टेशन प्रबंधक पी एम पुंडकर यांनी भुसावळ येथे संपर्क साधून दुर्घटना रहात गाडी पाठविण्याबाबत विनंती केली. भुसावळ येथून ठीक २.५५ वा. ही अपघात मदत रेल्वे गाडी रेल्वे स्थानकावर पोहोचली व दुपारी ३ वाजून १५ मिनिटांनी रुळावरुन घसरले चारही चाक परत रुळावर पूर्ववत करून वाहतूक सुरळीत केली. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही अप्रिय घटना घडली नाही. या कामासाठी शेगाव रेल्वे स्थानकाचे परिवहन निरीक्षक मोहन देशपांडे यांनी विशेष प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!