पैठण (शिवनाथ दौंड) : श्रीमती लिलाबाई त्रिंबकराव पाटील कन्या विद्यालय, आडूळ तर्फे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव निमित्त घरोघर तिरंगा झेंडा अंतर्गत आज शाळेत जवानांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सैनिक सागर कोल्हेचे पालक अंकुश कोल्हे यांचा सत्कार संजीव सुर्यवंशी, सैनिक मयुर पाटोळेचे पालक हरिभाऊ पाटोळे यांचा सत्कार भुजंग पवार तर सैनिक शुभम गोडसेचे पालक श्रीमंत गोडसे यांचा सत्कार कैलास महाजन यांनी केला. सैनिक सदाशिव बनकर व जामवाडी येथील सैनिक आकाश चव्हाण यांचाही शब्द सुमनांनी गुणगौरव करण्यात आला. यावेळी गेवराई मर्दा येथील पालक तथा उपसरपंच मोहम्मद पठाण हे शाळेतील दोन गरीब मुलींना ड्रेस देणार आहेत. त्याबद्दल त्यांचा गांगुर्डे सरांनी सत्कार केला.
सूत्रसंचालन हरलाल परदेशी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.