Aalandi

श्री ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका ट्रस्टतर्फे प्रमुख जिल्हा न्यायाधीश देशमुख यांचा सत्कार

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका ट्रस्टच्या वतीने पुणे जिल्हा प्रमुख सत्र व जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख यांचा सत्कार श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका ट्रस्टच्या वतीने ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर यांचे हस्ते करण्यात आला.
आळंदी येथील भक्त निवास मध्ये श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे भक्त निवास येथे श्री ज्ञानेश्वर दर्शन व ग्रंथ प्रकाशन लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख जिल्हा न्यायाधीश देशमुख यांचा सत्कार ॲड. विष्णू तापकीर यांचे हस्ते शाल, श्रीफळ, उपरणे देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष प्रा.डॉ. सदानंद मोरे, सह धर्मादाय आयुक्त सुधीरकुमार बुक्के, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त विकास ढगे पाटील, विश्वस्त डॉ. अभय टिळक,पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, ह. भ.प. विठ्ठल महाराज वास्कर यांचा सत्कार करण्यात आला. पालखी सोहळा मालक राजेंद्र आरफळकर, ह. भ.प. रमेश घोंगडे, साहेबराव काशीद बाळासाहेब चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!