धुळे (ब्युराे चीफ) – भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त आज, दि.१३ ऑगस्ट रोजी हर घर तिरंगा अभियान जनजागृतीसाठी जमियत उलेमा हिंद धुळे तर्फे आज सकाळी ११.०० वाजता शेखुल इस्लाम हुसेन अहमद मदनी चौक मौलवीगंज येथून पाचकंदील, गांधीपुतळा, आग्रा रोड मार्गे देवपुर बस्थानाकापर्यंत रैली काढण्यात आली. या रैलीला प्रचंड नागरीकांचा प्रतिसाद मिळाला, व शहराच्या ठिकठिकाणी लोकांनी रैलीचे स्वागत केले.
या रैलीत मोठ्या प्रमाणात मुस्लीम बांधवांनी सहभाग घेतला, तसेच या रैलीच्या वेळेस आमदार फारुख शाह यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले. धुळे शहराचे आमदार फारुख शाह यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात नागरीकांची उपस्थिती होती. या रैलीला यशस्वी करण्यासाठी आयोजक जमियते उलमा हिंद, धुळे जिल्हाध्यक्ष मुफ्ती कासीम जिलानी, उपाध्यक्ष गुफरान शेठ पोपटवाले, सचिव अब्दुल अहद, शहरध्यक्ष मुफ्ती मसूद, मुफ्ती शकील तसेच माजी. नगरसेवक सव्वाल अन्सारी, नगरसेवक लल्लू शेठ, वसिम बारी, वसिम मंत्री,मुख्तार बिल्डर, आमीन पटेल, माजी नगरसेवक मुजफ्फर हुसेन, राष्ट्रवादी अल्पसंख्याक शहरध्यक्ष सलीम शेख, इरशाद जहागीरदार, नगरसेवक नासीर पठाण, नगरसेवक सईद बेग मिर्झा, डॉ.सरफराज अन्सारी, वसिम अकरम, निजाम सय्यद, हलीम अन्सारी, रिजवान हाजी व शहरातील प्रतिष्ठित नागरीक व नगरसेवक यांनी परिश्रम घेतले या रैलीचा समारोप देवपुर बसस्थानक येथे करण्यात आला.