– तिसरी व चौथीच्या विद्यार्थिनींची रांगोळी स्पर्धा उत्साहात
चिखली (तालुका प्रतिनिधी) – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अंत्री खेडेकर येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेत इयत्ता तिसरी व चौथीच्या मुलींची रांगोळी स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत मुलींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. तसेच, जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांच्या संकल्पनेतून सुवर्ण महोत्सवाची मानवी रांगोळी विद्यार्थ्यांनी साकरली होती. ही रांगोळी गावकर्यांसह शिक्षक व विद्यार्थ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली होती.
शिक्षणाबरोबर विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी मराठी प्राथमिक शाळा अंत्री खेडेकर येथे वर्ग तिसरा व वर्ग चौथा मुली यांच्यामध्ये रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये मुलींनी सहभाग नोंदवला व आपल्या कलागुणांना वाव दिला. या स्पर्धेत पुढीलप्रमाणे मुली यशस्वी ठरल्या आहेत. वर्ग चौथा – १) प्रतिक्षा रवी मोरे, २) अरुंधती विठ्ठल खेडेकर, ३) मयुरी वसंता मोरे तर वर्ग तिसरा – १) कोमल शंकर सुरोशे, २) पूजा प्रल्हाद माळेकर, ३) स्वराली एकनाथ मळेकर. या स्पर्धेचे आयोजन सुवर्णमहोत्सवानिमित्त सहशिक्षक ज्ञानेश्वर खेडेकर सर यांनी केले होते. पर्यवेक्षक म्हणून भगवान चेके सर, राऊत सर, लहाने सर यांनी निरीक्षण करून वरील नंबर दिले. शाळेचे मुख्याध्यापक सुभाष खेडेकर सर, परिहार सर यांनी या स्पर्धेसाठी परिश्रम घेऊन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
तसेच, येथील मराठी पूर्व माध्यमिक शाळेमध्ये रांगोळीच्या संकल्पनेतून अमृत महोत्सवानिमित्त शाळेमध्ये विद्यार्थ्यांना ७५ सुवर्ण महोत्सवाचा आकृतीमध्ये बसवून, एक अनोखी मानवी रांगोळी साकारण्यात आली. या कलाकृतीला गावातील लोकांनी बघण्यासाठी उत्कृष्ट प्रतिसाद दिला. शाळेमधील व्यवस्थापन समिती व शिक्षक वृंद यावेळी हजर होते.
Leave a Reply