मेहकर (तालुका प्रतिनिधी) – सहकार विद्या मंदीर, सुलतानपूर येथे ‘आजादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत.
देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजादी का अमृत महोत्सव साजरा करण्याचे देशवासीयांना आवाहन केलेले आहे. त्याअंतर्गत हर घर तिरंगा मोहीम व शाळेमध्ये विविध उपक्रम यानिमित्ताने घेतले जाणार आहेत.
सहकार विद्या मंदिर, सुलतानपूर या शाळेमध्ये आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. यांपैकी एक म्हणजे निबंध स्पर्धा, यामध्ये इयत्ता आठवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी ‘आजादी का अमृत महोत्सव’ या विषयावर निबंध लिहिले. ही स्पर्धा घेण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. पिंपरकर मॅडम तसेच उपमुख्याध्यापक श्री वायाळ सर व तसेच श्री ठेंग सर, श्री वसाने सर, श्री भानापुरे सर, श्री गारोळे सर तसेच इतर शिक्षकांनी पुढाकार घेतला होता. या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
Leave a Reply