– लवकरच सातगाव फाटा- कुलमखेड व कुंबेफळ फाटा-टाकळी रस्त्याचे काम सुरू होणार
– भर पावसात केला बांधकाम खात्याचा निषेध, रास्ता रोकोनंतर काहीवेळातच लेखी आश्वासन
मेरा बुद्रूक (प्रताप मोरे) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा पक्षाच्या कामगार सेलचे अध्यक्ष मनोजभाऊ दांडगे यांच्यासह सातगाव, कुलमखेड, कुंबेफळ व टाकळी येथील नागरिकांनी काल भरपावसात सातगाव फाटा ते कुलमखेड व कुंबेफळ फाटा ते टाकळी रस्त्याची दुरुस्ती करण्याकरिता धरणे आंदोलन केले व या आंदोलनादरम्यान वेळेत प्रशासनाचे अधिकारी उशिरा पोहोचल्याने काही वेळ रास्ता रोको आंदोलनसुद्धा पावसात करण्यात आले. या आंदोलनाची दखल घेत, जिल्हा परिषद बांधकाम विभाग बुलढाणाचे अधिकारी यांनी लेखी आश्वासन देऊन धरणे आंदोलन मागे घेण्यास विनंती केली व आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी सातगाव, कुलमखेड, कुंबेफळ, टाकळी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
सदर रस्त्याच्या बाबतीत याआधी दिनांक १७ नोव्हेंबर २०२०, दिनांक २३ नोव्हेंबर २०२० व दिनांक ७ ऑक्टोबर २०२१ रोजी वरील रस्त्याबाबत निवेदन दिलेले होते. सदर रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी कामे मंजूर करण्यात आल्याचेसुद्धा सदर कार्यालयाकडून सांगण्यात आलेले होते. परंतु अद्याप सुद्धा या रस्त्याची कोणतेही प्रकारची दुरुस्ती करण्यात आलेली नव्हती. रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे, शाळेतील मुलांना व जनतेला खूप मोठ्या अडचणींना या ठिकाणी सामना करावा लागत आहे. त्यामुळे मनोजभाऊ दांडगे यांनी १८ जुलै २०२२ चे आपल्या निवेदनामध्ये परत एकदा या रस्त्याच्या दुरुस्तीच्या बाबतीत कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बुलढाणा यांना सदर रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, याकरता निवेदन दिले होते. येणार्या पुढील पंधरा दिवसांच्या आत दोन्ही रस्त्याची दुरुस्ती करण्यात नाही आली तर दिनांक ८ ऑगस्ट २०२२ रोजी जनतेसह मनोजभाऊ दांडगे जनआंदोलन करतील असे या निवेदनात इशारा सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला होता व याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असे नमूद केले होते त्या अनुषंगाने आज जनआंदोलन करण्यात आले.
सातगाव फाटा ते कुलमखेड व कुंबेफळ फाटा ते टाकळी रस्त्याची दुरुस्ती करण्याच्या संदर्भातील जनआंदोलनाला सकाळी १० वाजता सुरुवात झाली. ४ वाजेपर्यंत लोकशाही मार्गाने शांततेने आंदोलनकर्त्यांनी आंदोलन केले. परंतु जिल्हा परिषद बांधकाम विभागातील निगरगट्ट अधिकारी, कर्मचारी यांनी आंदोलनाकडे जाणून बुजून कानाडोळा करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी चिडून जाऊन कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला व रोडवर येऊन जिल्हा परिषद बांधकाम विभागाचा निषेध असो अशा गगनभेदी घोषणा देऊन काही काळ रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. परंतु लागलीच पोलीस विभागाचे अधिकारी अनिल पाटील, पोलीस उपनिरीक्षक व त्यांचे सर्व सहकारी आंदोलन कर्त्यांची चर्चा करून समज काढून मध्यस्थी केली व बांधकाम विभागाच्या कर्मचार्याकडून आश्वासनाचे लेखी पत्र उपलब्ध करून दिले. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी आंदोलन तुर्त स्थगित केले, भविष्यात रस्त्याची नवीन बांधणी व दुरुस्ती न झाल्यास उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, अशी घोषणा मनोजभाऊ दांडगे व त्यांचे सर्व सहकारी व गावकरी यांनी केली. सदर आंदोलन भर पावसात केले तसेच पावसातच रस्ता रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, कुणीही स्वतः च्या जीवाची पर्वा न करता आंदोनलात सहभागी झाले.
याप्रसंगी राष्ट्रवादी जेष्ठ नेते तथा कुलमखेड सरपंच विठ्ठलसिंग मोरे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष निलेश भाऊ देठे, राष्ट्रवादी चिखली विधानसभा उपाध्यक्ष गणेश नरवाडे पाटील, राष्ट्रवादी जेष्ठ नेते शिवाजीराव पालकर, राष्ट्रवादी ओबीसी सेल जिल्हा सरचिटणीस विजय धंदर पाटील, राष्ट्रवादी चिखली विधानसभा उपाध्यक्ष तथा माजी सरपंच तुळशीराम दादा काळे, डॉ भगवान देठे, पुरुषोत्तमजी सुरोशे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका महिला कार्याध्यक्ष तथा राष्ट्रवादी प्रदेश संघटक सचिव निर्मलाताई तायडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस राजू पाटील जगताप, राष्ट्रवादी चिखली विधानसभा सरचिटणीस रामेश्वर पाटील तायडे, राष्ट्रवादी जेष्ठ नेते राजेश नागवे पाटील, भारत भाऊ शिंदे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष गजानन पालकर, राष्ट्रवादी तालुका युवक उपाध्यक्ष जगन कानडजे पाटील, सातगाव उपसरपंच प्रदीप भाऊ घुसळकर, हिम्मतराव देठे, अर्जुन भाऊ सुस्ते, राष्ट्रवादी तालुका सरचिटणीस सुशील भाऊ हिवाळे,समाधान भाऊ पालकर, राष्ट्रवादी ओबीसी सेल तालुका कोषाध्यक्ष गणेश पाटील तायडे, समाधान भाऊ पालकर, गणेश देठे, दिगंबर शिंदे, प्रभू शिंदे,नामदेव काकडे,सांडू देठे, नारायण आमले, रामेश्वर पुरी, पंढरी पालकर, शरद पालकर,रमेश भाऊ तायडे, विष्णू भाऊ शिंदे,ज्ञानदेव भाऊ पालकर, समाधान भाऊ कानडजे, वैभव घुसळकर,योगी पालकर, विशाल पालकर, अश्विन राजपूत, कृष्णा पालकर,समाधान शिंदे, ऋषिकेश राजपूत, उद्धव गिरी,शरद शिंदे, पवन राजपूत, योगेश देठे, आदित्य वैद्य, निलेश वैद्य, विलास पालकर, गणेश शिंदे, अंकुश देठे, धनंजय वैद्य,कृष्णा वाघमारे,सतीश पालकर, शरद नरवाडे,प्रमोद पालकर,सुजित शिंदे,सुरेश शिंदे, रामचंद्र पालकर,अनिल चव्हाण, असिप कुरेशी, प्रकाश हिवाळे, ज्ञानेश्वर पालकर,नारायण आमले, गणेश धंदर,राष्ट्रवादी टाकळी शाखा उपाध्यक्ष दत्ता गोराडे, आदिनाथ वानखेडे,विशाल तायडे,विष्णू धांडे,सुभाष तायडे, राष्ट्रवादी शाखा अध्यक्ष राहुल भाऊ वागग, दत्तू भाऊ आघाव,राष्ट्रवादी कुंबेफळ शाखा अध्यक्ष अंबादास बावस्कर, शरद पट्ठे,सुनील पालकर,सुरेश गावंडे, राम गिरी,सुनील हवाळे, विकास पालकर,योगेश देठे,पालकर, सुनील काकडे, उमेश राजपूत, शंकर गिरी,शिंदे शिंदे, सत्यपाल सूर्यवंशी,रामगिर गिरी, शेषरावं पाटील कानडजे, समाधान दांडगे, गजानन शेनफड, पालकर,विलास तायडे, संजय जाधव, शुभम तायडे, हर्षल तायडे, प्रभाकर शिंदे, लक्षम नागवे, बबन कानडजे, समाधान रयभान कानडजे, प्रकाश जैन, रामेश्वर सपकाळ,विनोद रावळकर, भगवान सपकाळ, संतोष दांडगे, उमेश दांडगे आदींची उपस्थिती होती.
Leave a Reply