अनिल मोरे यांना “ग्रेट इंडियन पार्लामेंट अवॉर्ड 2022″च्यावतीने सर्वाेत्कृष्ट सोशल वर्कर पुरस्कार जाहीर
बुलडाणा (प्रतिनिधी) – देश स्वातंत्र्य होउन 75 वर्षे पूर्ण झाली आहे. तर या स्वातंत्र्य दिन मोठ्या प्रमाणावर साजरा करावा म्हणून दिल्ली येथे आजादी का अमृत महोत्सव हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 75वा आजादी का अमृत महोत्सव निमित्त दिल्ली येथे संपन्न होणार्या ग्रेट इंडियन पार्लामेंट अवॉर्ड 2022 मधून लोणार तालुक्यातील अत्यंत सामान्य कुटुंबातील युवा नेतृत्व व सतत लोणार तालुक्यातील शेतकरी यांच्या प्रश्नाला वाचा फोडणार आणि आक्रमक भूमिका असलेल युवा नेतृत्व अनिल मोरे यांना ग्रेट इंडियन पार्लामेंट अवॉर्ड 2022 सर्वोत्कृष्ट सोशल वर्कर हा पुरस्कार जाहीर झाला आहे. 14 ऑगस्टरोजी हा पुरस्कार यांना दिल्ली येथे देण्यात येणार आहे.
यावेळी कार्यक्रमात सिनेमातील अभिनेते आणि अभिनेत्री उपस्थित हजेरी लावणार आहे. त्यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येणार आहे. बुलढाणा जिल्ह्या मधून अत्यंत सामान्य कुटुंबातील व्यक्ती गल्ली ते दिल्ली असा प्रवास हा खुप कौतुकास्पद असून, सर्व बुलढाणा जिल्हाची मान उंचावली आहे. अनिल मोरे हे सतत समाजातील गोर गरीब, गरजु ,अनाथ लोंकाना सढळ हाताने मदत करत माणुसकीचा वारसा जपत आले. समाजामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण असली तर हे अग्रेसर होउन त्या समस्याला तोंड देण्याचे काम सतत करत असतात. या सर्व पुरस्कार चे मानकरी माझे सर्व सहकारी व तसेच ज्या समाजातील लोकांनी मला या ठिकाणा पर्यंत पाठवले त्यांचा आहे. असे यावेळी अनिल मोरे यांनी म्हटले आहे . तसेच सर्वांचे मनापासून आभार मानले .