नांदुराच्या प्रतीक्षा लाहुडकार पाटील बनल्या ‘यीन’ केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अध्यक्षा
नांदुरा (तालुका प्रतिनिधी) – यीन माध्यमातून सामाजिक सेवेला सुरवात करणार्या मातृतिर्थ बुलडाणा जिल्ह्यातील सुकन्या प्रतीक्षा लहुडकर पाटील यांच्या कार्याची दखल यीन केंद्रीय समितीच्या माध्यमातून घेण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना लीडरशिप कॉन्वलेव्ह 22 मध्ये झालेल्या समिती निवड प्रक्रियेत यीन केंद्रीय कॅबिनेट स्त्री प्रतिष्ठा समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
मातृतिर्थ बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा शहर तसेच ग्रामीण भागातून त्यांनी वेगवेगळ्या सामाजिक कार्याची सुरवात केली. त्यांच्या कार्याला यीन या सकाळ माध्यम समूहाच्या उपक्रमाची साथ मिळाली. त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत यीन राज्य व्यवस्थापक श्यामसुंदर माडेवार तसेच, राज्याचे यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क प्रमुख संदीप काळे यांनी सदर जबाबदारी दिली आहे. याबाबतचे पत्र नुकतेच त्यांना प्रदान करण्यात आले असून, आगामी काळात जबाबदारी अधिक सक्षम आणि जिद्दीने पूर्ण करण्याचा विश्वास व्यक्त करत कामाचा ओघ समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत जावा ही अपेक्षाही व्यक्त केली आहे. प्रतीक्षा विष्णू लाहुडकार पाटील यांची 2021 मध्ये बुलडाणा जिल्हा उपाध्यक्ष तसेच केंद्रीय मंत्रीमंडळात सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक मंत्री म्हणून निवड झाली. मंत्रीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये त्यांची विदर्भ मधून तसेच मुलींमधून सभापती पटलावर ठराव मांडयला निवड झाली असे म्हणतात की संधी ही वारसा हक्काने मिळते पण कर्तृत्व सिद्ध करावं लागतं पण इथं संधी आणि कर्तृत्व दोन्हीही मेहनतीच्या जोरावर कमावलं याच जोरावर त्यांना आता केंद्रीय मंत्रीमंडळाच्या स्त्री प्रतिष्ठा समितीच्या अध्यक्ष म्हणून निवड झाल्याने विदर्भातील एक सामान्य कुटुंबातील मुलगी यीनच्या केंद्रीय मंत्रीमंडळातील स्त्री प्रतिष्ठानची अध्यक्ष बनू शकली आहे.