Uncategorized

बीडमध्ये खळबळ; हनुमानगडाचे मठाधिपती बुवासाहेब खाडे महाराजांवर बलात्काराचा गुन्हा!

पैठण (शिवनाथ दौंड) – बीड जिल्ह्यातून खळबळजनक घटना समोर आली आहे. बीडच्या हनुमान गडाचे मठाधिपती बुवासाहेब खाडे महाराज यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. बुवासाहेब जिजाबा खाडे असे त्यांचे पूर्ण नाव आहे. लग्नाचे आमिष दाखवून त्यांनी लैंगकि अत्याचार केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीवरुन, खाडे महाराज यांच्याविरोधात गुन्हा नोंदवून घेण्यात आला असून, पोलीस आता पुढील तपास करत आहेत. दुसरीकडे, खाडे महाराज यांनीदेखील आपल्याला मारहाण करून लूटण्यात आल्याची तक्रार पोलिसांत दिली आहे. त्यांच्यावर सुरुवातीला जामखेड येथे तर आता नगरमध्ये उपचार केले जात आहेत. तर खाडे महाराज यांना फसवले जात असल्याचा आक्षेप काहींनी खासगीत बोलताना नोंदवला आहे.
जून २०२२ ते जुलै २०२२ या काळात बलात्कार करण्यात आला, असा सनसनाटी आरोप पीडितेने खाडे महाराज यांच्यावर केला आहे. गुरुवारी रात्री उशिरा याबाबत तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीमुळे बीडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे खाडे महाराजांनीही आपल्याला मारहाण झाली असल्याची तक्रार पोलिसांत दिली आहे. मारहाण करुन आपल्याकडील सोन्याच्या ऐवज लुटण्यात आल्याचा दावा त्यांनी तक्रारीत केला आहे. त्यानुसार पाच संशयितांविरोधात खर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पीडित महिलेने आपल्या तक्रारीत, खाडे महाराज यांनी संमतीशिवाय शारीरिक संबंध ठेवले असल्याचा आरोप केला. लग्न करण्याचे आमिष दाखवून आपल्यावर बलात्कार करण्यात आल्याचा आरोपही पीडितेने केलेला आहे. गुरुवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास खाडे महाराज यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार आणि गुन्हा दाखल करण्यात आला. तथापि, या प्रकरणातील वस्तुस्थितीबाबत मात्र बीड, नगर जिल्ह्यात उलटसुलट चर्चा सुरु आहेत.

कोण आहेत खाडे महाराज?
बुवासाहेब जिजाबा खाडे हे हनुमानगड येथील मठाधिपती म्हणून ओळखले जातात. हनुमानगड हा बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात येतो. जामखेड इथं खाडे महाराज यांचे अनेक भक्तगण असल्याचेही सांगितले जाते. खाडे महाराज यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने बीडसह नगर जिल्ह्यात चर्चांना उधाण आले आहे.


दरम्यान, आपल्याला मारहाण केल्याप्रकरणी आणि लुटल्याप्रकरणी खाडे महाराज यांनी खर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सोन्याची चैन, अंगठी, मणी अशी एकूण १३ लाख ६० हजार रुपयांची लूट झाली असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले. त्यानुसार जामखेड तालुक्यातील मोहरीमध्ये राहणार्‍या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यात बाजीराव गीते, भिवा गोपाळघरे, अरुण गीते, राहुल गीते, रामा गीते यांच्यावर संशय व्यक्त करण्यात आला असून, त्यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला.दरम्यान, खाडे महाराज यांना मारहाण झाल्यानंतर त्यांनी जामखेड इथं रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना नगर इथं हलवण्यात आले. हे प्रकरण आता उघडकीस आल्यानंतर बीडमध्ये उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. आता पोलीस नेमकी याप्रकरणी कुणावर काय कारवाई करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!