Breaking newsCrimeKhandeshNandurbar

चारित्र्याच्या संशयावरून आठ महिन्यांच्या गर्भवती पत्नीचा गळा आवळून खून

– नराधम पती स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झाला
– आरोपी पती अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वरचा
नंदूरबार (आफताब खान) – नवापूर तालुक्यातील श्रावणी गावात रविवारी पहाटे एका २० वर्षीय गर्भवती पत्नीचा पतीने दोरीच्या साह्याने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पहाटे चार वाजेच्या सुमारास पत्नीचा खून करून पती विसरवाडी पोलीस ठाण्यात निघून गेला. त्यानंतर दोन्ही लेकर आईच्या जवळ झोपलेली होती. निरागस बालकांना माहीतच नाही की आपली आई आपल्याला सोडून निघून गेली. गावातील लोकांनी दरवाजा उघडला असता, त्या वेळी मृत अवस्थेत पडलेल्या आईजवळ दोन्ही बालके रडत होती. या घटनेने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे.
पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून आठ महिन्यांची गर्भवती पत्नीची हत्या करून पती अनिल गुलाब तांबे (वय २६ रा. नांदगाव खंडेश्वर, जिल्हा अमरावती) पहाटे सहा वाजेच्या सुमारास विसरवाडी पोलिस ठाण्यात जाऊन जमा झाला. त्याला विसरवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती सहाय्यक सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी दिली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल गुलाब तांबे हा गेल्या काही महिन्यांपासून श्रावणी गावातील बँक ऑफ बडोदा जवळील भागात पत्नी, चार वर्षाचा मुलगा, सहा वर्षाची मुलगी असे राहत होते. त्यांचा कुकर रिपेरिंग करण्याचा व्यवसाय होता. मृत पत्नी ही गर्भधारणेसाठी तिच्या मूळ गावी अमरावती येथे जाणार होती. त्याआधी दोघांमध्ये वाद झाला. आरोपी पतीने तिचा दोरीच्या साह्याने गळा आवळून खून केला, असे सूत्रांनी सांगितले. मृतक पत्नीला शवविच्छेदनासाठी खांडबारा ग्रामीण रुग्णालयात दाखल करून शवविच्छेदन केले असता, तीन किलोचे मृतक अवस्थेत आठ महिन्यांचे बाळ आढळून आले. पतीने पत्नी सोबतच एका गर्भातील भ्रूणची दुहेरी हत्या केल्याने संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहे. महिलेच्या नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला. दोन बालकांचा पालन पोषणाचा प्रश्नदेखील यादरम्यान उद्भवणार आहे. आईचा मृत्यू आणि वडिलांना आईच्या मृत्यूने होणारा तुरुंगवास यादरम्यान लेकरांचे काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!