शाळेत येण्यासाठी रस्ता नसल्याने नदीला पूर आल्यावर दोरी बांधून करावा लागतो प्रवास!
नंदुरबार (आफताब खान) – देशात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरी केला जात आहे. मात्र नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागात राहणारे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पाण्यातुन जीवघेणी कसरत करुन शाळा गाठावी लागत असल्याच विदारक चित्र समोर आले आहे. उमराणी गावा अंतर्गत येणाऱ्या काल्लेखेतपाडा शाळेवरच्या विद्यार्थ्यांना या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
या शाळेत परिसरातल्या सावरीपाडा, देवपाडा, मोवाडीपाडा, पाटीलपाडा, होळीपाडा, खालचापाडा, नीलपीपाडा या पाड्यावरून ६० ते ७० विद्यार्थी शाळेत येत असताता. मात्र या विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी रस्ताच नसल्याने त्यांना शाळा लगतच्या नाल्यातुन यावे लागते. या नाल्याला सध्या पुर आला असुन त्यात पाण्याचा प्रवाह जास्त आहे. त्यामुळे चिमुकल्यांना रोज दोरीच्या सहाय्याने नाला पार करावा लागत आहे. यात जोखीम असल्याने स्वत शिक्षक आणि ग्रामस्थ देखील नाल्यात उभे राहुन विद्यार्थ्यांना नाला पार करण्यासाठी मदत करतात. त्यामुळेच या विद्यार्थ्यांना रोज दिवसातुन दोन वेळा जीव धोक्यात घालुन आपला शैक्षणिक प्रवास करावा लागत असल्याच विदारक चित्र समोर येत आहे.