BULDHANA

विदर्भातील जागावाटपावरून महायुतीमध्ये तिढा !

भाजपाची विदर्भात ५० हून अधिक जागा लढण्याची भूमिका

– विदर्भात अजित पवार, एकनाथ शिंदे १० ते १२ जागांवर मानवे लागणार समाधान

नागपूर विशेष प्रतिनिधी :- विधानसभा रणधुमाळी जोरात सुरू असून पक्षप्रमुख जोमाने कामाला लागल्याचे दिसून येत आहे. विधानसभा निवडणूकीत विजय मिळविण्यासाठी प्रत्‍येक पक्षाने कंबर कसली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात सुरूवात होत आहे. पण दुसरीकडे जागावाटपाचा तिढा मात्र सुटत नसल्याचे दिसून नाही. मविआ आणि महायुती यांचे विदर्भावरून रस्सीखेच असल्याचे समोर आले आहे. विदर्भातील जागावाटपावरून ठाकरे आणि काँग्रेस आमनेसामने आहेत. पण आता महायुतीमध्येही विदर्भाच्या जागावाटपाचा तिढ निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

विदर्भात भाजपाने ५० जागा लढवण्याची तयारी केली आहे. त्‍यामुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना त्‍याग करावा लागणार का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. भाजपाने विदर्भात्‍ ५० हून अधिक जागा लढवण्याचा आग्रह धरला असून यामुळे महायुतीमध्ये तणावाचे वातावरण आहे.एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी नरमाईची भूमिका घेवून त्‍याग करतील का ? अशा राजकीय चर्चेला सुरूवात झाली आहे. अमरावती विभागात भाजपाला ३२ पैकी २४ जागा पाहिजे तर नागपूर विभागात ३० पैकी २७ जागा भाजपला मिळवण्याची शक्यता आहे.

विदर्भात एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या वाटयाला १० ते १२ जागा
विदर्भात एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या वाटयाला फक्त १० ते १२ जागा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमरावती जिल्ह्यात शहराची जागा अजित पवार गटाला, बडनेराची जागा अपक्ष रवी राणा तर एकनाथ शिंदे यांना दर्यापूरची जागा येणार असल्याची माहिती समोर आली आहे. अमरावतीमध्ये भाजप तिवसा,धामणगाव रेल्वे,मेळघाट,वरड – मोर्शी,अचलपूरची जागा लढणार आहे. बुलडाण्यातील पुसदची जागा अजित पवार यांना मिळेल असा अंदाज आहे. तर मेहकर .सिंदखेड राजा आणि बुलडाणा शिंदेना मिळतील. नागपूर विभागातील रामटेक आणि भंडारा या जागा शिंदेच्या वाटयाला येतील तर सडक अर्जुनाची जागा अजित पवारांकडे जाण्याची शक्यता आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!