MaharashtraMumbai

मुंबईत अनधिकृत दुकानांवर महानगर पालिकेचा बुलडोजर

मुंबई (प्रतिनिधी)-अंधेरी पूर्वेकडील अनधिकृत दुकानांवर आज मोठी कारवाई करण्यात आली.के पूर्व विभाग यांच्या पथकाने ही कारवाई केली. अंधेरी मेट्रो इथून जो स्कायवॉक आहे, तिथून ते मुंबई विमानतळाकडे जाणाऱ्या बेस्टच्या स्टॉप पर्यंत जेवढी चप्पल आणि बुटांची अनधिकृत दुकाने होती त्यांच्यावर कारवाई करत दुकाने जमीनदोस्त करण्यात आली. एक जेसीबी आणि दोन महानगरपालिकेच्या मालवाहू गाड्या यांच्यासह महापालिकेच्या जवळपास वीस ते पंचवीस कर्मचारी आणि अधिकारी मिळून ही मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमुळे येथील विक्रेत्यांची एकच तारांबळ उडाली.
          नवीन सरकार आल्यानन्तर मेट्रो 3 कुलाबा सिपझ अंडरग्राऊंड मेट्रो प्रकल्पामधील कामांना गती देण्यात आली आहे.ठाकरे सरकारने आरे मधील मेट्रो कारशेड बाबतचा निर्णय शिंदे सरकारने बदलत कारशेडच्या कामाला पुन्हा सुरुवात केली आहे. मेट्रोचे दोन डब्बे हे लककरच मुंबईत दाखल होणार असल्याची माहिती मिळाली आहे. मेट्रोचे डब्बे रस्ते मार्गाने येणार असून त्यासाठी आरेतील रोडवरील झाडांचा अडथळा निर्माण होऊ शकतो,यासाठी अडथळा ठरणारी झाडे आणि त्यांच्या फांद्या छाटण्याचे काम सुरू केले आहे.पवई,गोरेगाव आणि मरोळ या ठिकाणी असणारे चेकनाक्यांवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.येथील बेस्ट बसचे मार्ग वळविण्यात आले आहेत. आरेमध्ये बस येऊ न शकल्याने आरेत राहणाऱ्या शाळेच्या मुलांना दांडी मारावी लागली आहे.आज होणाऱ्या वृक्ष छाटणीमुळे वृक्ष प्रेमींनी हळहळ व्यक्त केला आहे.शिंदे सरकार आल्यापासून आरे पिकनिक गार्डन येथे दर रविवारी वृक्ष प्रेमी आंदोलन करताना पाहायला मिळतात,मात्र आज या आंदोलन कर्त्यांचा कोणताही अडथळा होऊ नये यासाठी इथली वाहतूक अडवण्यात आली आहे.इथल्या रहिवाशी वगळता प्रवेश बंद करणयात आला आहे,असे स्थानिकांकडून सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!