सिंदखेडराजा (अनिल दराडे) – कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव बैलपोळा, बैलपोळा वर्षभर बळीराजाच्या खांद्याला खांदा लावून काबाडकष्ट करणार्या इमानी अशा बैलांप्रती सद्भावना व्यक्त करण्याचा दिवस उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये साजरा करण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी बैलांची पूजन व स्वागत केले.
कष्टाशिवाय मातीला, बैलाशिवाय शेतीला अन् बळीराजाशिवाय देशाच्या प्रगतीला पर्याय नाही. शेतकरीराजा पोळ्याच्या सणानिमित्त शेतात वर्षभर काबाडकष्ट कष्ट करणार्या आवडत्या बैलांना गरम पाण्याने अंघोळ घालून, बाशिंग झुलांनी सजवून, त्यांची वाजतगाजत मिरवणूक काढून, प्रेमाने पूर्जा-अर्चा करून, त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करीत असतात. उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये प्रा. संजय खडसे यांनीसुद्धा बैल पोळ्याचे पूजन केले. यावेळी सिदखेडराजाचे तहसीलदार प्रवीण धानोरकर यांनीसुद्धा येथील बैलाचे पूजन व स्वागत केले. व तसेच उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे यांनी सर्व शेतकरी बांधवांना बैलपोळा सणाच्या शुभेच्छा दिल्या.