SINDKHEDRAJAVidharbha

कोराडी प्रकल्पावरील विद्युत मोटारींतून तांब्याच्या वायरी लंपास; २० ते २५ शेतकर्‍यांना लाखोंचा फटका!

– चोरट्यांचा शोध घेण्याचे साखरखेर्डा पोलिसांसमोर आव्हान

साखरखेर्डा (अशोक इंगळे) – शेवगा शिवारात कोराडी प्रकल्पावर शेतीला सिंचनासाठी बसवण्यात आलेल्या शेतकर्‍यांच्या विद्युत मोटारमधील तांब्याची वायर मोटारीची तोडफोड करून अज्ञात चोरट्यांनी चोरून गेल्याची घटना दि. ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. जवळपास वीस ते पंचवीस शेतकर्‍यांच्या विद्युत मोटरपंपाला या चोरट्यांनी चुना लावला आहे. त्यामुळ शेतकर्‍यांचे लाखोंचे नुकसान झाले असून, परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान साखरखेर्डा पोलिसांसमोर निर्माण झालेले आहे.

सविस्तर असे, की साखरखेर्डा पोलीस स्टेशनअंतर्गत शेवगा जॉहागीर हे गाव कोराडी प्रकल्पाच्या बाजूला वसलेले आहे. या गावातील सर्वच शेतकर्‍यांच्या जमिनी दक्षिण भागात आहेत. कोराडी प्रकल्पावरुन या शेतकर्‍यांनी पाईप लाईन करुन सिंचनाची सोय केली आहे. भाजीपाला, यासह बागायती शेती करुन आपली आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेतात. जून महिन्यापासून पावसाळा सुरू झाल्याने सर्वच शेतकर्‍यांच्या मोटारी बंद आहेत. दि. ७ ऑगस्ट रोजी काही शेतकर्‍यांना आपल्या मोटारपंपाची खोल फिटींग काढून अज्ञात चोरट्यांनी आतील तांब्याची तार चोरुन नेल्याचे लक्षात आले. ही वार्ता गावात पसरताच सर्वच शेतकरी मोटारपंप शोधन्यासाठी गेले असता, जवळपास २५ शेतकर्‍यांच्या मोटारी खोलून तर काहींच्या फोडून त्यातील तांब्याची तार चोरुन नेल्याचे लक्षात आले. उपरोक्त घटनेची माहिती बीट जमादार प्रविण सुरळकर यांना देण्यात आली. परंतु, पंचनामा करून गुन्हा दाखल करु असे त्यांनी शेतकर्‍यांना सांगितले. त्यामुळे वृत्त लिहिपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. हंगामात शेतकर्‍यांना मोटारपंप सुरू करण्यासाठी नाहकच २५ ते ३० हजार रुपयांचा खर्च लागणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, लवकरात लवकर या चोरट्यांचा शोध घ्यावा, अशी मागणी बबन काकडे, भगवान सुरुशे, सुमित गवई, समाधान गिर्‍हे, अरुण गिरी महाराज, विष्णू खरात यांनी आणि शेतकर्‍यांनी केली आहे.


साखरखेर्डा पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीवरील मोटारपंपाची चारवेळा चोरी!

साखरखेर्डा येथील पाणीपुरवठा योजना ही कोराडी प्रकल्पावरुन करण्यात आली आहे. पावसाळ्यात महालक्ष्मी तलाव भरल्यानंतर कोराडी प्रकल्पाच्या विहिरीकडे ग्रामपंचायत फारसे लक्ष देत नाही. त्यामुळे सहा ते आठ महिने मोटारपंप बंद राहतो. त्यामुळे चोरट्यांनी चार वेळा मोटार पंप काढून चोरुन नेला आहे. यावेळी हा मोटार पंप सुरु असल्याने चोरटे त्याकडे फिरकले नाही.


साहेब गुन्हा दाखल करा; पोलिसांनी दिले शेतकऱ्यांना हे उत्तर….!

उपस्थित शेतकरी यांनी पंचनामा करण्यासाठी आलेल्या पोलीस बांधवांना विनंती केली की, साहेब गुन्हा दाखल करून घ्या त्यावेळेस शेवगा बीटचे बीट जामदार सुरडकर यांनी शेतकऱ्यांना सांगितले की, आम्ही सुद्धा शेतकऱ्यांची मुले आहोत पूर्णपणे या प्रकरणाचा कसून तपास आम्ही करतो. त्याचबरोबर आपण सुद्धा शेतकरी बांधवांनी जर कोणावर संशय असेल तर आम्हाला बिनधास्तपणे सांगा. नंतर थोडा जरी सुगावा लागला तर आपण केव्हाही गुन्हा दाखल करू शकतो. असे नाही की, जेव्हा प्रकरण घडलं तेव्हाच गुन्हा दाखल करू शकतो. परंतु साहेबांच्या या उत्तरावर शेतकऱ्यांचे समाधान नसून पोलिसात गुन्हा दाखल करायचाच, असा सूर संबंधित शेतकरी बांधवांनी पोलीस बांधव केल्यानंतर केला आहे.

पटवारी, मंडळ अधिकार्‍यांचे आंदोलन मागे; उद्यापासून ‘महसूल’चे कामकाज सुरूळीत होणार!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!