आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : आषाढी पायी वारी सोहळ्या अंतर्गत श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या वैभवी पादुका पालखी सोहळ्याचे परंपरेने माऊली मंदिरात हरिनाम गजरात आगमन झाले. राज्यात कोरोनाचे प्रादुर्भावाने गेल्या दोन वर्षात पायी वारी सोहळा झाला नाही. मोजक्याच वारकरी यांचे उपस्थितीत बसने सोहळा साधे पणाने साजरा करण्यात आला होता. यावर्षी मात्र लाखो भाविकांचे उपस्थितीत पायी वारी सोहळा राज्यात साजरा झाला. पंढरीत श्रीविठ्ठल देव भेट , गोपाळपुर काला उरकून श्रींचे वैभवी पादुका पालखी सोहळ्याचे हजारो भिवंडी, वारकरी, नागरिकांच्या उपस्थितीत नामजयघोषात अलंकापुरीत पोहचला. परंपरेने रविवारी ( दि.२४ ) आळंदीत आषाढी एकादशी सोहळा हरिनाम गजरात होत आहे.
ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे परंपरेने आळंदी मंदिरात पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, राजेंद्र आरफळकर यांनी श्रींचे पादुका आळंदी देवस्थानकडे परंपरेने सुपूर्द केल्या. श्रींचे पादुका पालखी मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर विना मंडपातून माऊलींचे मंदिरात सोहळा आरतीने विसावला. तत्पूर्वी माऊली मंदिरातून श्रींचे स्वागत प्रथा परंपरेने दिंडी हरिनाम गजरात पालखी सोहळ्यास सामोरी जात महानैवेद्य झाला. अभंग हरिनाम गजरात सोहळ्याचे स्वागत व आगमन झाले.
सोहळा आळंदीत प्रवेश प्रसंगी पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, राजेंद्र आरफळकर, आळंदी देवस्थानचे विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख अँड. विकास ढगे पाटील, वेदमूर्ती विष्णू महाराज चक्रांकित, हंसराज चक्रांकित, व्यवस्थापक माऊली वीर, श्रीधर सरनाईक, मानकरी माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील, योगीराज कु-हाडे, योगेश आरु, ज्ञानेश्वर दिघे, विठ्ठल घुंडरे, श्रींचे सेवक चोपदार बाळासाहेब रणदिवे, चोपदार उद्धव रणदिवे, ज्ञानेश्वर गुळुंजकर,संजय रणदिवे, तुकाराम माने, भीमराव घुंडरे,ज्ञानेश्वर घुंडरे, नगारखाना सेवक मानकरी बाळासाहेब भोसले, समीर घुंडरे, विनायक घुंडरे, सचिन कुऱ्हाडे, महेश केदारी, महादेव रत्नपारखी यांचे सह मानकरी, दिंडीकरी, वारकरी भाविक उपस्थित होते.
आळंदी मंदिरात ज्ञानेश्वर महाराज यांचे वैभवी पादुका आल्यानंतर श्रींचे संजीवन समाधी मंदिरात आरती झाली. आळंदीत पालखी सोहळ्याचे स्वागतास भाविकांनी रस्त्याचे कडेला दुतर्फा उभे राहून गर्दी करीत हरिनाम जयघोषात स्वागत केले. यावर्षी पालखी सोहळ्यावर कोणतेही निर्बंध नसल्याने सोहळा मोठ्या आनंदी उत्साही मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला.आळंदीत श्रींचे सोहळ्याचे जोरदार स्वागत करण्यात आले. रांगोळ्यांचे पायघड्या,पुष्पसजावट करण्यात आली. ठिकठिकाणी माऊली भक्त मंडळांनी श्रींचे पालखीवर पुष्प वर्षाव करीत स्वागत केले. भाविकांना विविध ठिकाणी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. आळंदीतील प्रथा परंपरांचे पालन करीत श्री नरसिव्ह सरस्वती स्वामी महाराज यांचे मूळपीठ येथे ह,भ.प. विष्णू महाराज चक्रांकित आणि परिवाराचे वतीने पिठलं भाकरी चा महाप्रसाद वाटप करण्यात आले. यासाठी भाविकांनी मोठी परंपरा जोपासत महाप्रसादास गर्दी केली. ३२ दिवसांचे विरहा नंतर श्रींचे पालखी सोहळा आळंदीत येताच येथे चैतन्य अवतरले. मोठ्या ज्ञानभक्तीमय वातावरणात आळंदीकरांचे वतीने सोहळ्याचे स्वागत आळंदी देवस्थान व ग्रामस्थांचे वतीने व्यवस्थापक माऊली वीर, आळंदी नगरपरिषद प्रशासक मुख्याधिकारी अंकुश जाधव यांचे वतीने अधीक्षक किशोर तरकासे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील, पोलीस नाईक मच्छिंद्र शेंडे, मंडलाधिकारी स्मिता जोशी, स्वामी सुभाष महाराज, आजी,माजी पदाधिकारी, विविध सेवाभावी संस्था, संघटना यांचे वतीने करण्यात आले.
थोरल्या पादुका मंदिरात पालखी सोहळ्याचे स्वागत आरती
आळंदीत माऊलींचा सोहळा आगमनापूर्वी थोरल्या पादुका मंदिर येथे श्रींचे वैभवी सोहळ्याचे स्वागत ट्रस्ट चे वतीने अध्यक्ष अॅड. विष्णु तापकीर यांचे हस्ते पादुका पूजा, श्री माऊलीची आरती करण्यात आली. यावेळी पालखी सोहळ्याचे मालक राजेंद्र आरफळकर, पालखी सोहळा प्रमुख अॅड विकास ढगे पाटील, मानकरी योगीराज कुऱ्हाडे, योगेश आरु, बाळासाहेब रणदिवे चोपदार, विणेकरी सेवक, यांचा सत्कार अध्यक्ष ॲड विष्णू तापकीर यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी खजिनदार दत्तात्रय गायकवाड, मनोहर भोसले, शांताराम तापकीर, ह.भ.प. रमेश महाराज घोगडे, ह.भ.प राजाराम महाराज तापकीर, ह.भ.प. गजानन महाराज सोनुने, एकनाथ देवकर उपस्थित होते. यावेळी ॲड तापकीर यांचे हस्ते मान्यवरांना शाल, उपरणे, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. मंदिर व मंदिर परीसरात अनुष्का केदार हिने लक्षवेधी रंगावली व पुष्प सजावट केली होती. यावेळी भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आले.