BULDHANAChikhaliVidharbha

BREAKING NEWS! भक्ती महामार्ग रद्द करण्याच्या हालचाली गतिमान; आ. श्वेताताईंच्या विनंतीवरून उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्याच बोलावली उच्चस्तरीय बैठक!

– सर्व वरिष्ठ अधिकारी, बुलढाणा जिल्हाधिकारी यांनाही बैठकीला हजर राहण्याचे आदेश

चिखली/मुंबई (महेंद्र हिवाळे/प्राची कुलकर्णी) – मातृतीर्थ सिंदखेडराजा ते शेगाव या भक्ती महामार्गाला सुमारे ४३ गावांतून होणारा तीव्र विरोध पाहाता, चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी राज्य सरकारकडे हा महामार्ग रद्द करून पीडित शेतकर्‍यांना दिलासा देण्याची मागणी केली आहे. तसेच, चिखली व बुलढाणा तालुक्यांतील विविध महत्वाच्या प्रश्नीही आवाज उठवला आहे. ताईंची या मागण्या पाहाता, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्याच (दि.८) मंत्रालयात महत्वाची उच्चस्तरीय बैठक बोलावली असून, या बैठकीला सर्व संबंधित विभागाच्या सचिवदर्जाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना तयारीनिशी हजर राहण्याचे आदेश दिले गेले आहेत. बुलढाणा जिल्हाधिकारी यांनाही या बैठकीला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर राहण्याचे आदेश दिले असून, उद्याच भक्ती महामार्ग रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच, चिखली बसस्थानकाची बसस्थानकाची सुधारणा करून ६० नवीन बसेस देणे, कृषी वीजपंपासाठी जोडणी मागणार्‍या शेतकर्‍यांना तातडीने कनेक्शन देणे, खडकपूर्णा ते पेनटाकळी प्रकल्प जोडून वाहून जाणारे पाणी पेनटाकळी धरणात वळविण्याच्या प्रकल्पास मंजुरी देण्यात यावी, खडकपूर्णा धरणाच्या दरवाजांना फ्लॅप बसवून उंची वाढविण्यात यावी, व अतिरिक्त पाणीसाठा निर्माण करून तो दुष्काळी भागातील सिंचन अनुशेष भरून काढण्यासाठी वापरण्यात यावा, यासह आदी महत्वपूर्ण मुद्द्यांवर ही बैठक फलदायी ठरणार आहे.
उद्या तातडीने बोलावली बैठक.

चिखली मतदारसंघातील आणि राज्य शासनाशी संबंधित धोरणात्मक प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी उद्याची ही महत्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली असून, उद्या (दि.८) दुपारी १२ वाजता ही बैठक सह्याद्री अतिथीगृह बैठक येथे होणार आहे. या बैठकीला आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्यासह महसूल, जलसंपदा, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम, परिवहन विभाग, सामान्य प्रशासन, सार्वजनिक आरोग्य, ऊर्जा, कृषी, मदत व पुनर्वसन, नगरविकास, शालेय शिक्षण, पाणी पुरवठा व ग्रामविकास विभागाच्या सचिवांसह सर्व प्रमुख अधिकार्‍यांना तयारीनिशी हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. बुलढाणा जिल्हाधिकारी, सीईओ, मुख्याधिकारी चिखली यांनाही व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर राहण्याचे सांगितले आहे. आणीबाणीच्या काळात कारावास भोगलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या मानधनात ३० हजार इतकी वाढ करण्यात यावी, चिखली येथे १०० खाटांचे उपजिल्हा रूग्णालय करण्यात यावे, त्यासाठी सद्या सुरू असलेल्या ५० खाटांच्या दर्जावाढऐवजी १०० खाटांचे श्रेणीवर्धन करून सुधारित मान्यता द्यावी, चिखली येथे ट्रामा केअर सेंटर सुरू करावे, चिखली येथे माता व बालकांच्या आरोग्यासाठी मटर्नल चाईल्ड हेल्थ विंगला मान्यता द्यावी, मॅनेजमेंट कोट्यातील पूर्वप्रवेशित मुलींनाही मोफत शिक्षणाचा लाभ द्यावा, चिखली नगरपालिका प्रधानमंत्री आवास योजनेच्या मंजूर प्रकल्पांना राज्य व केंद्र शासनाचा उर्वरित निधी द्यावा, विविध योजनांच्या घरकुलांची कामे तातडीने मार्गी लावण्यात यावी, चिखली शहरातील एकता नगर भागातील अतिक्रमण नियमानुकूल करून त्या ठिकाणी राहणार्‍या नागरिकांना घरकुलाचा लाभ देण्यात यावा, चिखली एमआयडीसीअंतर्गत पीएपी भूखंड वाटप करण्यात यावे, अमरावती एमआयडीसी येथील प्रादेशिक कार्यालय अकोला येथे सुरू करण्यात यावे, समृद्धी महामार्गावरील पळसखेड (मलकदेव) ता. सिंदखेडराजा येथून चिखली, बुलढाणा, मलकापूर या शहरांना जोडणारा पोचमार्ग निर्माण करण्यात यावा, चिखली ते मलकापूर या रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्यात यावे, देऊळगावघाट, धाड व सात गावे पाणी पुरवठा योजनेचा स्त्रोत करडी धरणाऐवजी अन्य ठिकाणी घेण्यात यावा, खडकपूर्णा प्रकल्पाच्या दरवाजांना फ्लॅप लावून उंची वाढविण्यात यावी, व अतिरिक्त जलसाठा निर्माण करून हे पाणी सिंचनाचा अनुशेष असलेल्या दुष्काळी भागाला देण्यात यावे, सप्टेंबर २०२१ पासून १५७१ कोटींच्या दाखल केलेल्या खडकपूर्णा प्रकल्पास सुप्रभा मिळावी, खडकपूर्णा-पेनटाकळी प्रकल्प जोडण्यात यावा व पश्चिम वाहिनी वाहून जाणारे पाणी खडकपूर्णा प्रकल्पातून उपसा करून पेनटाकळी धरणात सोडण्यात यावे, गांगलगाव येथील भूसंपादीत जमिनीचा मोबदला देण्यात यावा, वळती (ता.चिखली) येथे पेरू संशोधन केंद्र व उद्यान विद्या महविद्यालयास मान्यता देण्यात यावी, येळगाव धरणाचे स्वयंचलित गेट एकाचवेळी उघडत असल्याने होणारे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी, पेनटाकळी प्रकल्पातील देवदरी (ता.चिखली) गावाच्या पुनर्वसन प्रस्तावास तातडीने मंजुरी देण्यात यावी, भक्ती महामार्ग तातडीने रद्द करण्यात यावा, अमडापूर, वडारवस्ती, मौजे तेल्हारा, चिखली नगरपरिषद हद्दीतील नागरिकांना नमुना ८ किंवा सातबारा किंवा पीआर कार्ड देण्यात यावे, चिखली मतदारसंघातील विज वितरणशी संबंधित कामे मार्गी लावण्यात यावीत, चिखली आगाराला नवीन ६० बसेस देण्यात येऊन चिखली आगाराच्या सुधारणेसाठी निधी देण्यात यावा व या आगाराची दुरवस्था दूर करावी, आदी महत्वपूर्ण मागण्या आमदार श्वेताताई विद्याधर महाले पाटील यांनी राज्य सरकारकडे केलेल्या आहेत. या मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्यासाठी उद्याच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक लावली आहे.


चिखली व बुलढाणा तालुक्यातील सर्वच महत्वाच्या प्रश्नांवर उद्या (गुरूवारी) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उच्चस्तरीय बैठक घेऊन हे प्रश्न मार्गी लावणार आहेत. आ. श्वेताताई महाले या शांत स्वभावाच्या व आपले काम निष्ठेने करणार्‍या महिला नेतृत्व आहेत. त्यांच्याविरोधात राजकीय गदारोळ घालणार्‍यांचे फक्त तोंडच वाजत राहते. हे बोंब ठोकणारे नेते जेव्हा आमदार वैगरे होते, तेव्हा त्यांना चिखली-बुलढाणा मतदारसंघातील एकही प्रश्न सोडविता आला नाही. तसेच, पीकविमा, शेतीपिकांची नुकसान भरपाई हे प्रश्नदेखील आ. श्वेताताई महाले यांनीच सोडविले आहेत. या शेतकरीहिताच्या प्रश्नीदेखील काही ‘आंदोलनजीवी’ नेते फक्त आंदोलने करून शेतकर्‍यांची सहानुभूती मिळवण्याचाच प्रयत्न करताना दिसलेत. दुसरीकडे, आ. श्वेताताई या शांतपणे या सर्व प्रश्नांवर राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा करून थेट निर्णय घेताना, व हे प्रश्न मार्गी लावताना दिसून आल्या आहेत. त्यामुळे “श्वेताताईंचे कामच बोलते”, अशा प्रतिक्रिया सर्वसामान्यांतून उमटत आहेत.
————–

पीकविमा नुकसान भरपाईची रक्कम ३१ ऑगस्टपर्यंत शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होणार!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!