पीकविमा नुकसान भरपाईची रक्कम ३१ ऑगस्टपर्यंत शेतकर्यांच्या खात्यात जमा होणार!
– चिखली व बुलढाणा तालुक्यातील ६७ हजार ८८८ शेतकर्यांना ३७ कोटी रूपये मिळणार!
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – बुलढाणा जिल्ह्यातील सुमारे सहा लाख व त्यातील चिखली तालुक्यातील खरीप हंगामातील २६ हजार १५, तर रब्बी हंगामातील ८ हजार ७८६, तसेच बुलढाणा तालुक्यातील खरीप हंगामातील २२ हजार ९७४ तर रब्बी हंगामातील १० हजार ११३ शेतकर्यांनी तक्रारी करूनही पीकविमा कंपनीने त्यांना नुकसान भरपाई दिली नव्हती. त्यामुळे दोन्ही तालुक्यातील खरीप हंगामात ४८ हजार ९८७ व रब्बी हंगामातील १८ हजार ८९९ तक्रारकर्ते शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहिले. याप्रश्नी चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. तसेच, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला होता. याप्रश्नी आज (दि.७) अखेर कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची ऑनलाईन बैठक घेतली. याच बैठकीतून पीकविमा कंपनीच्या अधिकार्यांना ३१ ऑगस्टपूर्वी पीकविमा रक्कम जमा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ३१ ऑगस्टपूर्वी पीकविमा नुकसान भरपाईची रक्कम पात्र शेतकर्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. या निर्णयाचे श्रेय फक्त आ. श्वेताताई महाले यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे असल्याने इतर ‘आंदोलनजीवीं’नी ते घेण्याचे प्रयत्न करू नयेत, असा टोलाही एका नेत्याने हाणला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील पीकविमा नुकसान भरपाईस पात्र परंतु पीकविमा कंपनीने नाकारलेल्या दाव्यांची रक्कम ३१ ऑगस्टपर्यंत शेतकर्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी बुलढाणा जिल्ह्यातील पीकविमा नुकसान भरपाईबाबत लोकप्रतिनिधींच्या आग्रहाखातर संपन्न झालेल्या ऑनलाईन बैठकीत दिल्याने बुलढाणा जिल्ह्यातील ६ लाख शेतकर्यांना लाभ होणार आहे. यामध्ये चिखली विधानसभा मतदारसंघातील ६९ हजार शेतकर्यांना ३७ कोटी रुपयांची पीकविमा नुकसान भरपाई मिळणार असून, त्यासाठी आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी केलेल्या सातत्याच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.
चिखली विधानसभा मतदारसंघातील चिखली तालुक्यातील खरीप हंगामातील २६०१५, तर रब्बी हंगामातील ८७८६ तर बुलढाणा तालुक्यातील खरीप हंगामातील २२९७४ तर रब्बी हंगामातील १०११३ शेतकर्यांनी तक्रारी करूनही पीकविमा कंपनीने त्यांना नुकसान भरपाई दिली नव्हती. त्यामुळे दोन्ही तालुक्यातील खरीप हंगामात ४८ हजार ९८७ व रब्बी हंगामातील १८ हजार ८९९ तक्रारकर्ते शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहिले. या शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी आ. सौ.श्वेताताई महाले पाटील यांनी यासाठी विधी मंडळाच्या अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. तसेच कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे पत्र देवून बैठक आयोजित करण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने मागील महिन्यात २४ जुलै २०२४ रोजी कृषिमंत्री यांच्या दालनात बैठक पार पडली होती. त्या बैठकीत कृषिमंत्री धनंजय मुंढे यांनी १५ दिवसांत याबाबत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना दिले होते. त्यानुसार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी पीकविमा कंपनीने १८ टक्के व्याजाच्या परताव्यासह नुकसान भरपाई द्यावी, असा अहवाल शासनास सादर केला होता. आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या प्रयत्नांने आणि मंत्री धनंजय मुंढे यांनी दिलेल्या निर्देशामुळे चिखली आणि बुलढाणा तालुक्यातील ६७ हजार ८८८ तक्रारकर्त्या शेतकर्यांना ३७ कोटी रुपयांची रक्कम ३१ ऑगस्टच्याआत जमा होणार असल्याने खरिप हंगामाच्या पिकांच्या संगोपनासाठी आर्थिक मदत मिळणार आहे. या बैठकीत केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव, आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे, डॉ.संजय कुटे, डॉ.संजय रायमुलकर, अॅड. आकाश फुंडकर, राजेश एकडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ढगे, कृषी विभागाचे उच्चस्तरीय अधिकारी तथा भारतीय कृषी पीकविमा कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.