LONARVidharbha

मेहकर-लोणार विधानसभा लढविण्यासाठी ‘महाराष्ट्र क्रांतीकारी आघाडी’सज्ज!

– निवडणुकीच्या अनुषंगाने लोणार येथील बैठकीत रणनीती निश्चित
– सर्व कार्यकर्त्यांनी ताकदीने व एकजुटीने कामाला लागावे – डॉ.ज्ञानेश्वर टाले

बिबी (ऋषी दंदाले) – शिंदे गटाचे आमदार डॉ. संजय रायमुलकर यांना जोरदार आव्हान देण्यासाठी महाराष्ट्र क्रांतीकारी आघाडी सज्ज झाली असून, लोणार-मेहकर विधानसभा मतदारसंघातून शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात आघाडीच्यावतीने उमेदवार उभा केला जाणार आहे. याबाबत लोणार येथे नुकतीच बैठक पार पडली असून, या बैठकीत निवडणुकीची रणनीती निश्चित करण्यात आली आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर मोठी आक्रमक लढाई उभी करावी लागणार आहे, असे आवाहन याप्रसंगी महाराष्ट्र क्रांतीकारी आघाडीचे नेते डॉ. ज्ञानेश्वर टाले यांनी याप्रसंगी केले आहे.

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या मार्गदर्शनाखाली व डॉ.ज्ञानेश्वर टाले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शासकीय विश्रामगृह लोणार येथे चळवळीतील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. यावेळी शेतकरी पीकविमा, कर्जमुक्ती, शेतमजूर यासह तरुणांच्या प्रश्नावर आंदोलनासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. तसेच मेहकर-लोणार मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने साधकबाधक चर्चा पार पडली. यामध्ये ऋषांक चव्हाण यांनी बैठकीचे प्रास्तविक केले. डॉ.ज्ञानेश्वर टाले, सहदेव लाड, गजानन तनपुरे यांनी बैठकीत मनोगत व्यक्त केले. आगामी विधानसभा निवडणुकीला कसे सामोरे जायचे, त्याची दिशा व व्यूहरचना ठरवण्यात आली. सर्व बूथ रचना आढावा, तसेच राहलेली बूथ रचना प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्या त्या सर्कलप्रमाणे जबाबदारी देण्यात आली. संपर्क अभियान राबवत लवकरच त्याबाबत आढावा घेण्यासाठी मिंटिग घेण्यात येईल. तसेच आजच्या बैठकीत सर्वानुमते विधानसभा निवडणूक ताकदीने लढवावी, असा निर्णय एकजुटीने झाला. विधानसभा मतदारसंघात सर्व घराघरात आपला उमेदवार गेला पाहिजेत, असे नियोजन प्रत्येकाने करावे, असे सर्वानुमते ठरले. बैठकीला मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते. तसेच दरमहिन्याच्या दुसर्‍या व चौथ्या गुरूवारी जनता दरबार घेऊन शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी यांचे प्रंलबित प्रश्न धडक मार्गी लावण्यासाठी प्रशासनाच्या विरोधात आवाज उठविल्या जाईल, असाही निर्णय याप्रसंगी केले. यासाठी आम्ही कार्यालयातच उपस्थित राहणार असे डॉ. ज्ञानेश्वर टाले यानी सांगितले. यावेळी अनिल चनखोरे, लांडगे, गजानन म्हस्के, देवेंन्द्र आखाडे, साजन शहा, शिवनारायण राऊत, गजानन तनपुरे, गणेश आघाव, परमेश्वर आघाव, गजानन सोसे, संतोष खाडे, विजय फोलाने, रवी इंगळे, संतोष सानप, संतोष आघाव व इतर शेतकरी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!