BULDHANAVidharbha

बुलढाणा, मेहकर, सिंदखेडराजा, लोणार व चिखली तालुक्यांत उभे राहणार बीएसएनलचे ८ नवीन टॉवर!

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – ग्रामीण भागातही बीएसएनएलची मोबाईल आणि इंटरनेट सेवा ग्राहकांना उत्तमरीत्या मिळावी, या दृष्टिकोनातून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी नवीन टॉवरची मागणी केली होती. त्यानुसार जिल्ह्यातील बुलढाणा, मेहकर, सिंदखेडराजा, लोणार व चिखली तालुक्यांत आता ८ नवीन टॉवर उभारले जाणार आहेत.

बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण भागात भारतीय दूरसंचार निगम अर्थात बीएसएनएलची सेवा मिळत नाही, अशा तक्रारी ग्रामीण भागातून केंद्रीयमंत्री तथा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. यासंदर्भात दूरसंचार विभागाशी पत्रव्यवहार करून त्यांनी बीएसएनलला सूचनाही केल्या होत्या. बीएसएनएलची इंटरनेट व मोबाईल सेवा सुधारण्याच्या दृष्टिकोनातून नवीन टॉवर उभारण्याची गरज असल्याचे बीएसएनएलने सांगितले होते. त्यानुसार, नवीन टॉवरचा प्रस्ताव तयार करून तो संबंधित विभागाला पाठवल्यानंतर त्याचा पाठपुरावा ना. प्रतापराव जाधव यांच्या कार्यालयाच्यावतीने करण्यात आला होता. या पाठपुराव्याला अखेर यश आले असून, बुलढाणा जिल्ह्यात आता नवीन आठ टॉवर ग्रामीण भागामध्ये उभारल्या जाणार आहे. यामध्ये बुलढाणा तालुक्यातील दहिद खुर्द, पळसखेड नाईक, मेहकर तालुक्यातील करतवाडी, चिंचाळा सिंदखेडराजा तालुक्यातील वाकड जहागीर, जळगाव जामोद तालुक्यातील पळशी वैद्य, लोणार तालुक्यातील मढी आणि चिखली तालुक्यातील चंदनपूर येथे हे बीएसएनएलचे टॉवर उभारल्या जाणार आहेत. या टॉवरमुळे इंटरनेट आणि मोबाईलची बीएसएनएल सेवा सुधारून नेटवर्कही ग्राहकांना उपलब्ध होणार आहे.
———-

दूरसंचारमंत्री अश्विनी वैष्णव यांचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी मानले आभार!

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण भागात बीएसएनएलची सेवा सुधारण्याच्या दृष्टिकोनातून नवीन टॉवरची मागणी केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, बुलढाणा जिल्ह्यात नवीन ८ टॉवर मंजूर केले, त्याबद्दल त्यांचे नामदार प्रतापराव जाधव यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
—————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!