पाचोड (विजय चिडे) – पैठण तालुक्यातिल कुतुबखेडा व दादेगांव येथील निवडणूक पार पडली असून, यामध्ये लोकशाही शेतकरी विकास पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे. कुतुबखेडा व दादेगांव विविध विकास कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत झालेल्या मतदानात लोकशाही शेतकरी विकास पॅनलने तेरा पैकी दहा जागांवर विजय मिळवत सोसायटीवर आपले निविर्वाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
विजयी उमेदवारात आबासाहेब हजारे, शिवाजी हजारे, महेंद्र गव्हाणे, नामदेव गहाळ, काकासाहेब कर्डीले, सुनिल पठाडे, शहाजी झिणे, दिलीप गिरी, अपेक्षा भागवत हजारे, शशिकलाबाई हजारे तर प्रतिस्पर्धी स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनलचे सतिश जगदाळे, संदिप काकडे, कैलास गहाळ, तीन उमेदवार विजयी झाले. असे एकुण तेरा उमेदवार विजयी झाले आहेत.
लोकशाही शेतकरी विकास पॅनलच्या विजयी उमेदवारांचे पंचायत समितीचे माजी सभापती नंदकुमार पठाडे, सरपंच अनिल हजारे, उपसरपंच सुरेश हजारे, आप्पासाहेब करंगळ, प्रभाकर हजारे, परसराम हजारे, दिंगबर हजारे, मुरलीधर गहाळ, बापुसाहेब मानमोडे, कल्याण हजारे, नंदकिशोर हजारे, भाऊसाहेब हजारे, शिवनाथ हजारे, संपत झिने, महादेव हजारे, उद्धव हजारे, सुरेंद्र गव्हाणे, सुनिल हजारे, प्रल्हाद गहाळ, देविदास हजारे, संतोष हजारे आदींनी अभिनंदन केले.