– रविवारी रक्षा विसर्जन, परिसरात शोक व्यक्त
चिखली/साकेगाव (संजयनाथा निकाळजे) – साकेगाव येथील मुख्य रस्त्यावरील लाखो रूपयांची जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी दान देणारे दानशूर व्यक्तिमत्व साकेगाव येथील दामोदर गोविंदा निकाळजे यांचे मंगळवार, दि. १६ जुलै रोजी निधन झाले. त्यांच्या रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम रविवारी (दि.२१) होणार आहे.
चिखली तालुक्यातील साकेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा उभारायचा तेव्हा जागेचा प्रश्न बिकट होता. मात्र सामाजिक कार्यकर्ते श्रीकृष्ण दामोदर निकाळजे यांनी वडील दामोदरबाबा गोविंदा निकाळजे त्यांच्यापुढे हा प्रश्न मांडला गेला, तेव्हा त्यांनी ‘बाबासाहेबांसाठी काय पण’ म्हणून तात्काळ होकार दिला, व स्वतःची राहती जागा दान देऊन त्या ठिकाणी शासनाच्या रीतसर परवानगीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा उभा राहिला. मनाचा मोठेपणा दाखऊन बाबासाहेबांच्या पुतळ्याला जागा दान दिली. त्यामुळे त्यांचा हा आदर्श समाजामध्ये निश्चितच आखण्याजोगा आहे. अशा या दानशूर असलेले ज्येष्ठ समाजसेवक दामोदरबाबा निकाळजे यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी १६ जुलै रोजी निधन झाले. त्यांचा रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम रविवार, २१ जुलै रोजी साकेगाव येथे आयोजित केला असल्याची माहिती त्यांचा मुलगा श्रीकृष्ण निकाळजे, ग्रामपंचायत सदस्य जितू निकाळजे यांनी दिली. दानशूर बाबांना ब्रेकिंग महाराष्ट्रच्या टीमच्यावतीने भावपूर्ण आदरांजली.!