LONAR

युवानेते संजय खार्डे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्याचे वाटप!

बिबी (ऋषी दंदाले) – येथील युवानेते व विविध सामाजिक कार्यात अग्रेसर राहणारे संजयभाऊ खार्डे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळेतील मुला-मुलींना शालेय साहित्याचे वाटप करून त्यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला.

युवानेते संजय खार्डे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळा बिबी येथे विद्यार्थी व विद्यार्थिनींना वही व पेन आदी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. संजूभाऊ खार्डे हे नेहमीच सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतात. त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त इतरत्र होणारा खर्च टाळून शाळेतील मुलांना साहित्यवाटप केले. याप्रसंगी सरपंचपुत्र दीपक गुलमोहर, उपसरपंच भास्कर खुळे, ग्रामपंचायत सदस्य संदीप बनकर, प्रशांत इंगळे व शाळेचे मुख्याध्यापक डहाळके सर, कुहीटे सर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!