Head linesSINDKHEDRAJAVidharbha

हिवरा आश्रम, साखरखेर्ड्यासह ६५ गावे अंधारात; ३३ केव्हीचा वीजपुरवठा चोवीस तांस बंद!

– ‘अंधेरा कायम रहे..’! मेहकर ते साखरखेर्डा लाईनवर सतत बिघाड! वंचित बहुजन आघाडीनेही दिला आंदोलनाचा इशारा

साखरखेर्डा (अशोक इंगळे) – येथील ३३ केव्ही उपकेंद्रातील वीजपुरवठा २४ तासांपेक्षा जास्त वेळ होऊनही सुरु न झाल्याने साखरखेर्डावासीयांसह हिवरा आश्रम व परिसरातील ६५ गावातील नागरिकांना अख्खी रात्र अंधारात काढावी लागली आहे. याबाबत एकही अधिकारी सकारात्मक प्रतिसाद देत नसल्याने वीज केव्हा सुरु होईल, हे सांगता येत नाही. महावितरणच्या निकृष्ट कारभाराबद्दल परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, वीज पुरवठा सुरूळीत न झाल्यास सोमवारी आंदोलनाचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे. तसेच, वंचित बहुजन आघाडीनेदेखील याप्रश्नी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

थकीत बिलामुळे वीज पुरवठा खंडित होईल, लगेच फोन करा'; महावितरणच्या नावाने बनावट मेसेज - Marathi News | 'Bill will cut off power supply, call immediately'; Fake message in the name of ...साखरखेर्डा येथील लोकसंख्या २५ हजार असून, साखरखेर्डा उपकेंद्रावर २४ गावे सलग्न आहेत. ११ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास अचानक वीजपुरवठा खंडीत झाला. नेहमी प्रमाणे वीजपुरवठा खंडीत होत असल्याने ३० मिनिटाला लाईन सुरु होईल, असे नागरिकांना वाटले. परंतु, रात्री ९ पर्यंत वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने ग्राहकांनी उपकेंद्रातील कर्मचार्‍यांना विचारणा केली असता मेहकर येथून बंद आहे. तेवढेच कारण मिळाले. परंतु, वीजपुरवठा का खंडीत झाला याचे सकारात्मक उत्तर कोणीच दिले नाही. शेवटी सर्वच कर्मचार्‍यांचे फोन बंद येत असल्याने लाईन सुरु होईल याची अपेक्षा सर्वांनी सोडून दिली, आणि रात्रभर वीजपुरवठा खंडीत राहिला. सकाळी वरिष्ठ अधिकारी यांना सरपंच सुनील जगताप यांनी संपर्क साधला असता, त्यांनी तत्काळ वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले. आज १२ जुलै रोजी ११ : ३० वाजता वीजपुरवठा सुरु झाला आणि अवघ्या दोन तासात पुन्हा बंद झाला. तो पुन्हा सायंकाळपर्यंत सुरुच झाला नाही.

आमचे कर्मचारी काम करीत आहेत. काम पूर्ण झाल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत होईल.
– हिरालाल जांभूळकर, उपअभियंता, सिंदखेडराजा
——
साखरखेर्डा, पिंपळगाव काळे, हिवरा आश्रम येथील ३३ केव्ही उपकेंद्रातील वीजपुरवठा सतत खंडीत होत आहे. तो सुरळीत झाला नाही तर सोमवारी १५ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने साखरखेर्डा उपकेंद्रावर भव्य डफडे मोर्चा काढण्यात येईल.
– तेजराव देशमुख, माजी सभापती

आज शुक्रवार असल्याने आठवडी बाजाराचा दिवस, अनेक व्यापार्‍यांचा व्यवसाय वीजेअभावी बंद ठेवावा लागला. यावर्षी खंडीत वीजपुरवठ्यामूळे नागरिक हैराण झाले आहेत. याची दखल कोण घेणार की सतत खंडीत वीजपुरवठ्याला सामोरे जावे लागले, हे सांगता येत नाही. शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त आहेत. त्यांना सकाळी सहा वाजता शेतावर जावे लागते. सायंकाळी शेतातून घरी आले तर लाईन गुल झालेली दिसते. पाणी भरावे कसे, दळण चक्कीत अटकले, भाकरी कशी करावी यासह अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. जर अशीच परिस्थिती साखरखेर्डावासीयांची राहिली तर गाव सोडून जावे लागले, अशी परिस्थिती आहे. केवळ साखरखेर्डाच नव्हे तर पिंपळगाव काळे, हिवरा आश्रम हे दोन्ही उपकेंद्र बंद आहेत. त्यामुळे ६५ गावे कालपासून अंधारात आहेत.
——–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!