मेरा बुद्रूक, ता. चिखली (एकनाथ माळेकर) – भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे-पालवे या विधानपरिषद निवडणुकीत मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाल्याने त्यांच्या समर्थकांनी अंढेरा येथे जल्लोष साजरा केला. यानिमित्त फटाके फोडून गुलाल उधळण्यात आला. दरम्यान, देऊळगाव मही येथील ग्रामस्थ व कार्यकर्ते यांनी फटाके फोडून व गुलाल उधळत जल्लोष साजरा केला.
सविस्तर असे, की देवळगावराजा तालुक्यातील अंढेरा येथे पंकजाताई मुंडे यांचा विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ्यांचे समर्थक खचले होते. परंतु, आता विधानपरिषद निवडणुकीत पंकजाताईंच्या डोक्यावर गुलाल पडला आहे. पहिल्या पसंतीची २६ मते घेऊन त्यांनी विजय संपादन केला. त्यांच्या विजयानंतर अंढेरा गावामध्ये विजयी जल्लोषात फटाके फोडून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी पंकजाताईंचे समर्थक शिवसेना शिंदे गटाचे नेते सुभाष डोईफोडे तसेच सामाजिक कार्यकर्ते विनोदभाऊ वाघ यांचे खंदेसमर्थक माधव आंधळे, कारभारी सानप, बबन वाघ, पंचायत समिती सदस्यपती प्रमोद सानप, संतोष मधुकर सानप, जगन सानप, हरिभाऊ कायंदे, प्रभाकर मुंडे, राजूभाऊ राऊत, संतोष राऊत, रवी सानप, आसाराम सानप (पिटर), मधुकर चव्हाण, नितीन नागरे, किसन बनसोडे, पंढरी सानप, कैलास नागरे, पांडुरंग देशमुख, विठ्ठल नागरे आदी उपस्थित होते.