SINDKHEDRAJAVidharbha

दिव्य सेवा प्रकल्पाला वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमीत्त आर्थिक मदत!

साखरखेर्डा (विशेष प्रतिनिधी) – बुलढाणा जिल्ह्यातील अभयअरण्यांच्या कुशीत दिव्या सेवा प्रकल्प दिव्या फाऊंडेशनच्यावतीने चालविला जात असून, या प्रकल्पाला वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमीत्त मंडळकर कुटुंबाच्यावतीने ११ हजाराची आर्थिक मदत सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव मंडळकर यांनी देऊन महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा वारसा जोपासण्याची गरज आहे, असे भावनिक आवाहन केले.
दिव्य सेवा प्रकल्पाचे संचालक अशोक काकडे यांना आर्थिक मदतीचा हात देताना सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव मंडळकर, बबनराव लोढे.

वरवंड गावाजवळील अभय अरण्यांच्या कुशीत दिव्या सेवा प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. या प्रकल्पात मनोरुगणांवर उपचार केले जातात. मनोरुग्ण बरा झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले जाते. १० वर्षात ३७६ मनोरुग्णांना बरे करुन सामाजिक दायीत्वाची भुमिका या प्रकल्पाने पार पाडली. आज या प्रकल्पात ४६ महिला आणि ८० मनोरुग्ण उपचार घेत आहेत. १२६ मनोरुग्णांना दररोज आंघोळ, नास्ता, जेवण, औषधोपचार करण्यात येतात. हा प्रकल्प चालविण्यासाठी शासनाकडून कोणतीही आर्थिक मदत मिळत नाही. आजही सामाजिक दायित्वाची भुमिका स्विकारुण दानशूर व्यक्ती , सेवाभावी संस्था मदत करीत आहेत. १३ जून रोजी साखरखेर्डा येथील सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव मंडळकर यांचे वडील सदाशिव मंडळकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त रुढी परंपरेला झुगारून महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा वारसा जोपासून सेवाभावी संस्थेला मदत करण्याची तयारी दाखवली. १३ जून रोजी पैनगंगा सहकारी सुत गिरणीचे कार्यकारी संचालक बबनराव लोढे, ब्रेकिंग महाराष्ट्रचे विशेष प्रतिनिधी तथा ज्येष्ठ पत्रकार अशोक इंगळे, पत्रकार संतोष गाडेकर, पीएसआय सचिन कानडे यांच्या उपस्थितीत सर्जेराव मंडळकर यांनी दिव्या सेवा प्रकल्पाचे संचालक अशोक काकडे यांना आर्थिक मदतीचा हात म्हणून ११ हजार रुपये अनुदान दिले. याच प्रकल्पात साखरखेर्डा येथील सत्यभामा गवई यांच्या मधील सुधारणा पाहून खरोखरच मनोरुग्णांचे देवदूत म्हणून हा प्रकल्प सेवा करीत आहे,. असे भावनिक उद्गार निघाल्याशिवाय राहातं नाही.
—–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!