– पीक कर्जवाटपात राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखाधिकार्यांनी शेतकर्यांबाबत मवाळ भूमिका घेण्याची सूचना
चिखली (महेंद्र हिवाळे) – नैसर्गिक संकटाचा बळी ठरणार्या शेतकर्याचे वादळी वारे, गारपीट, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी यामुळे अतोनात नुकसान होते. मात्र, नियमाच्या कचाट्यात पकडून या ना त्या कारणाने शेतकर्यांना नुकसान भरपाई विमा देण्याची टाळाटाळ पीक विमा कंपनीकडून होत असल्याची उदाहरणे चिखली तालुक्यात मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत, या प्रकरणाची आपण चौकशी करणार असून, दोषी ठरणार्या एआयसी पीकविमा कंपनीच्या अधिकार्यांंविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असा सज्जड दम चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी एआयसी पीकविमा कंपनीला भरला. तसेच, पीककर्ज वाटपात राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखाधिकार्यांनी शेतकर्यांबाबत मवाळ भूमिका घ्यावी, कागदपत्रांची पूर्तता सौजन्याने करून जास्तीत जास्त शेतकर्यांना पीक कर्जाचे वाटप करावे, असे आदेशही त्यांनी बँकांना दिलेत.
चिखली तालुकास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक आ. श्वेताताई महाले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. कृषी विभागातर्पेâ या बैठकीचे आयोजन करण्यात आलेले होते. बैठकीला कृषी विभाग, महसूल विभाग राष्ट्रीयकृत बँकांचे प्रतिनिधी, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकार विभाग आदी विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी, तसेच कृषी सेवा केंद्रांचे संचालक उपस्थित होते. आ. श्वेताताई महाले यांनी खरीप हंगामाच्या पूर्वी शेतकर्यांसाठी शासकीय विभागांकडून केली जाणारी मदत, कर्ज पुरवठा, पीकविमा, बी – बियाणे पुरवठा आदी गोष्टींचा मागोवा या सभेतून घेतला.
शेतकर्यांचा संबंध येणार्या प्रत्येक शासकीय विभागाच्या अधिकारी व कर्मचार्यांनी शेतकर्यांना सर्वतोपरी सहकार्य करावे, अशा मार्गदर्शक सूचनादेखील आ. श्वेता महाले यांनी या सभेत केल्या. शेतकर्यांची हक्काची पीकविम्याची रक्कम नाकारणार्या एआयसी पीकविमा कंपनीच्या अधिकार्यांची चौकशी एका समितीद्वारे करावी, असे निर्देश या सभेत आ. महाले यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना दिले. दोषी आढळणार्यांवर कठोर कारवाई करण्याची भूमिका घेतली आहे. या सभेत तालुक्यातील निवडक शेतकर्यांना मूग व उडीद बियाण्याचे शासनाकडून मोफत वाटप करण्यात आले. आ. श्वेताताई महाले यांच्याहस्ते या बियाण्यांचे वितरण झाले.
याशिवाय, कृषी महाजन कृषी केंद्राचे कृषी सेवा केंद्राचे संचालक महेश महाजन यांनी सायकलिंगच्या स्पर्धेमध्ये आप्रिâका देशात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांचा करण्यात आला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे, प्रभारी तहसीलदार वैभव खाडे, सहाय्यक निबंधक सहकार राजेंद्र घोंगे, तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर सवडतकर, नाबार्डचे अधिकारी रोहित गाडे, पीकविमा कंपनीचे अधिकारी मयूर लोणकर, यांच्यासह भाजप शहराध्यक्ष पंडितराव देशमुख, तालुकाध्यक्ष सुनील पोफळे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष संतोष काळे, अनमोल ढोरे, युवराज भुसारी या बैठकीस उपस्थित होते.