Breaking newsBuldanaBULDHANAHead linesMaharashtra

चिखली, सिंदखेडराजा, देऊळगावराजा तालुक्यांना वादळी पावसाचा तडाखा!

– देऊळगाव घुबेत वादळाने टिनपत्रांसह झोक्यातील चिमुकली उडून गेल्याने तिचा करूण अंत!

चिखली/सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी) – जिल्ह्यातील सिंदखेडराजा, चिखली, देऊळगावराजा या तालुक्यांना वादळी पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. त्यामुळे शेतीसाहित्यांसह घरादारांचे मोठे नुकसान झाले आहे. चिखली तालुक्यातील देऊळगाव घुबे येथे वादळाने घरावरील छत उडून गेले. या छताच्या लोखंडी अँगलला बांधलेल्या झोक्यात सहा महिन्यांची चिमुकली झोपलेली होती. २०० फूट अंतरावर उडालेल्या पत्रांसह ती कोसळल्याने तिचा दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेने देऊळगाव घुबे गावावर शोककळा पसरली आहे.

कोकण, विदर्भात वादळी पाऊस ; खेडमध्ये वृक्षांची पडझड; नागपुरात सोसाट्याच्या वाऱ्यासह सरी | torrential rains create a havoc in konkan and vidarbha region zws 70कालपासून जिल्ह्यात वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस होत आहे. या पावसाने बळीराजा सुखावला असून, पेरण्यांनी जोर धरला होता. या पावसाने व वादळाने घरावरील टीनपत्रे उडून गेल्याने, तसेच बखारींवरील पत्रे व शेड उडाल्याने शेतीसाहित्यांसह घरादारांचे मोठे नुकसान झालेले आहे. तसेच, काही ठिकाणी जीवितहानीदेखील झाली. चिखली तालुक्यातील देऊळगाव घुबे येथे भरत मधुकर साखरे यांच्या सहा महिन्याच्या चिमुकलीचा करूण अंत झाला. घरातील लोखंडी अँगलला बांधलेल्या झोक्यात ही सई नावाची चिमुकली झोपलेली होती. वादळामुळे साखरे यांच्या घरावरील टीनपत्रे उडाली. त्यात ही चिमुकली झोक्यासह उडून जाऊन २०० फूट अंतरावर कोसळली. त्यात तिचा जागीच अंत झाला. या घटनेने साखरे कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला होता, तसेच देऊळगाव घुबेसह परिसरात एकच हळहळ व्यक्त होत होती.

सिंदखेडराजा व चिखली तालुक्यातील अनेक गावांना चक्रीवादळाचा फटका बसला आहे. लोकांच्या घरावरील पत्रे उडून गेल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. शेतमाल, बीबियाणे, खते यांच्या गोण्या भिजल्याने प्रचंड नुकसान झालेले आहे. देऊळगाव घुबे येथे सहा महिन्याची चिमुकली साई भरत साखरे ही टीनपत्रांसह उडून गेली आहे, ही अतिशय दुःखद घटना आहे. तरी प्रशासनाने तातडीने या नुकसानग्रस्तांची व्यवस्था करावी, व पंचनामे करून लवकरात लवकर या गावातील लोकांपर्यंत मदत पोहोचावी, अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केलेली आहे.
—————
विदर्भात मान्सून दाखल होण्यासाठी दोन दिवसांचा अवधी उरला आहे. तरीदेखील गेल्या चार दिवसांपासून चिखली, सिंदखेडराजा, देऊळगावराजा या तालुक्यांत जोरदार पाऊस व वादळे येत आहेत. सलग पडत असलेल्या या पावसाने शेतकरी सुखावला असून, ग्रामीण भागात पेरण्यांनी जोर धरला आहे.

देऊळगाव घुबेत चक्रीवादळाने घेतला पाच महिन्याच्या चिमुकलीचा बळी!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!