BuldanaBULDHANA

स्वतःच्या तोंडाला काळे फासून निवडणूक आयोग, मुख्यमंत्र्यांना निवेदन, 48 तासांत कारवाई न झाल्यास ‘सीएस’चे तोंड काळे करणार!

– रोठेंच्या मागण्या :  CS सुभाष चव्हाण यांची बदली करा, टंचाईग्रस्त गावात टँकर सुरू करा, बहिष्कार टाकलेला गावातील मागण्यांची पूर्तता करा!

बुलढाणा (विशेष प्रतिनिधी) – वादग्रस्त, भ्रष्टाचारी, हुकूमशहा जिल्हा शल्यचिकित्सक चव्हाण यांची त्वरित बदली करावी. बदलीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत 48 तासात त्यांना सक्तीच्या रजेवर जाण्याच्या आदेश पारित करावे. चव्हाण यांच्या नियुक्तीपासून देण्यात आलेले सर्व प्रमाणपत्र, कंत्राट याची चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी. त्यांच्या मालमत्तेची चौकशी करून अनधिकृत मालमत्ता शासन जमा करावी. जिल्ह्यातील शेतकरी शेतमजुरांनी बहिष्कार टाकलेल्या गावातील मागण्यांची पूर्तता करावी. पाणीटंचाईग्रस्त गावांना टँकर सुरू करावे. रोजगार हमी योजनेची कामे सुरू करावी. त्रस्त रुग्ण, कर्मचारी, डॉक्टरांच्या सन्मानार्थ आणि या घटनेच्या निषेधार्थ आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश चंद्र रोठे यांनी स्वतः आज स्वतःचे तोंड काळे करून निवेदन अप्पर जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्यामार्फत भारतीय निवडणूक आयोग आणि मुख्यमंत्री यांना निवेदन तक्रार सादर केली आहे. तर 48 तासात कारवाई न झाल्यास जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या तोंडाला काळे फासण्यात येईल. असा इशाराही निवेदनानंती दिला आहे.

निवेदन तक्रारीत नमूद करण्यात आले की,बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा शिल्य चिकित्सक चव्हाण हे रुग्णांना दिल्या जाणाऱ्या नाश्ता व आहारात 40% कमिशन घेतात. त्यामुळे रुग्णांना अत्यंत खालच्या दर्जाचे जेवण प्राप्त होत आहे.कर्मचारी, डॉक्टर यांचे पगार थांबवून त्यांच्याकडून परसेंटेज मिळेपर्यंत पगार काढत नाही. त्यामुळे असंख्य कर्मचारी आणि डॉक्टरांचे पगार सहा सहा महिने निघत नसल्याची दुर्दैवी बाब घडत आहे. तर कर्मचारी डॉक्टरांना तुम्ही कामावर या किंवा नका येऊ मी तुमची हजेरी लावतो. परंतु परसेंटेज दिल्याशिवाय पगार काढणार नाही. माझं कोणीच वाकड करू शकत नाही. मी मुख्यमंत्र्यांना, लोकप्रतिनिधींना पैसे देऊन या ठिकाणी आलेलो आहे. तुमच्याकडून जे होते ते करून घ्या. अशी उरमट हुकमशाहीची भाषा ते वापरत आहे. त्यांचा खरा बाप कोण आहे. त्याच्याही शोध लागला पाहिजे. 48 तासात उपरोक्त मागण्यांची पूर्तता होईल हे अपेक्षा आहे. आज मी स्वतःच्या तोंडाला काळे फासून या घटनेचा निषेध करत आहे. तर त्रस्त रुग्ण, नागरिक, कर्मचारी, डॉक्टर, कामगार, कंत्राटदार यांच्या सन्मानार्थ मी आज निषेध म्हणून स्वतःचे तोंड काळे करून निवेदन, तक्रार सादर केली आहे. तर यापुढे जिल्हा शल्य चिकित्सक चव्हाण जिथे दिसतील तिथे त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!