Marathwada

धार येथील अपघातात पाचाेडचे जाेशी गेले!

पाचोड (विजय चिडे) : मध्यप्रदेश मधील इंदूर येथे बस नर्मदा नदीवरील पुला खाली कोसळून झालेल्या अपघातात पैठण तालुक्यातील पाचोड येथील जगन्नाथ हेमराज जोशी (वय ७०) असे धार घटनेच मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून, त्यांच्या मृहदेह धार येथील रुग्णालयात ठेवण्यात आलेला आहे.

मध्य प्रदेशमधील इंदूरहून अमळनेरच्या दिशेने जाणारी एसटी महामंडळाची बस आज सकाळी पावणेदहाच्या सुमारास पूल तोडून १०० फूट खोल नर्मदा नदीत कोसळली. या अपघातात १३ प्रवाशांना जलसमाधी मिळाली. तर १२ ते १५ जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे.  ज्या मध्ये महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील हल्ली मुकाम पाचोड येथील जगन्नाथ हेमराज जोशी वय ७० वर्ष असे नाव असून ते मूळचे राजस्थान मधील मोहल्ला मल्लाडा उदयपूर येथील रहवाशी आहेत. ते सहा जून रोजी त्यांच्या जन्मदिस पाचोड येथे त्यांचा मुलगा प्रकाश जोशी यांच्या घरी साजरा करून राजस्थान येथे त्यांच्या पत्नीला सोडण्यासाठी गेले होते, ते पुन्हा आपल्या मुला कडे पाचोड येथे येत असताना हा आपघात झाला. तर जगन्नाथ जोशी यांनी नीता वेळी आपल्या मुलाला फोनवरून या बस मध्ये येत असल्याची कल्पना दिली होती. मुलाने बस मध्ये या येण्यास इंकार केल्यानंतर हि ते याच बसमध्ये प्रवसास निघाले आणि काळाने घाला घातला. धार जिल्ह्यातील खलघाट येथे ही घटना घडली.

बलकवाडा येथील खलटाका पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या नर्मदा नदीच्या पुलावर ही घटना घडली.  इंदूरवरून ही बस महाराष्ट्रातील अमळनेरकडे येत होती. मुसळधार पाऊस सुरू असताना अचानक चालकाचे नियंत्रण सुटले आणि पुलावरून बस नर्मदा नदीत कोसळली.  या बसमध्ये ५० ते ६० प्रवासी असल्याचे सांगितले जात आहे.  आतापर्यंत १३ जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे.  यामध्ये अजूनही बचावकार्य सुरू आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.  इंदूरजवळ अपघात झालेली एसटी बस (एमएच ४०, एन- ९८४८) ही जळगाव जिल्ह्यातील अमळनेर आगारची असल्याची माहिती समोर आली आहे. इंदूरमधून ही बस सकाळी ७.३० ला अमळनेरच्या दिशेने रवाना झाली होती. या घटनेमुळे पाचोड परिसरात मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!