Chikhali

महात्मा फुले-डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती; उद्यापासून 14 एप्रिलपर्यंत विविध कार्यक्रम

बुलढाणा (संजय निकाळजे) – महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी सम्राट अशोक- फुले- आंबेडकर जयंती उत्सव समिती चिखलीच्यावतीने ९ ते १४ एप्रिल दरम्यान सहा दिवस शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक तथा समाज प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने समाज बांधवांना बौद्धिक विचारांची मेजवानी या निमित्ताने मिळणार आहे.

चिखली येथील फुले -आंबेडकर वाटिका येथे मंगळवार ९ एप्रिल ते १४ एप्रिलदरम्यान विविध कार्यक्रम पार पडणार आहेत. यामध्ये मंगळवार ९ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता धम्म ध्वजारोहण व सामूहिक बुद्ध वंदना, सायंकाळी ७ वाजता भीमगीत आर्केस्ट्रा बबलू गायकवाड व सीमाताई मिसाळकर व स्थानिक कलाकार सादर करणार आहेत. बुधवार १० एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त अभिवादन, सायंकाळी ७ वाजता विनोद इंगळे बुलढाणा यांचे व्याख्यान, आधुनिक भारतात फुले- शाहू- आंबेडकर यांनी सांस्कृतिक संघर्षाच्या माध्यमातून सामाजिक क्रांती व वर्तमान स्थिती हा व्याख्यानाचा विषय राहणार आहे. गुरुवार ११ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रम, सायंकाळी ७ वाजता गटार नाटक सादर करणार आहेत वीरेंद्र गणवीर नागपूर. शुक्रवार १२ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता फुले शाहू आंबेडकर हीच आधुनिक भारताची विचारधारा या विषयावर जनसेवक सलमान खान अकोला यांचे व्याख्यान होणार आहे. सायंकाळी ७ वाजता प्रमुख उपस्थिती जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख अशोक लांडे, चिखली ठाणेदार संग्राम पाटील हे राहणार आहे. शनिवार १३ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता एड. जयमंगल धनराज मुंबई यांचे व्याख्यान, सायंकाळी ७ वाजता यशोगाथा महासूर्याची आर्केस्ट्रा प्रा. अविनाश नाईक नांदेड हे सादर करणार आहेत. रविवार १४ एप्रिल रोजी सकाळी साडेसात वाजता समता सैनिक दल व आजी-माजी सैनिक यांचे वतीने मानवंदना, छत्रपती ढोल ताशे पथक यांच्यावतीने महामानवांना मानवंदना, सकाळी ८ वाजता ऑटो, मोटरसायकल रॅली सुशीलकुमार राऊत, श्याम पवार, वसंता अवसरमोल, रवी राऊत, पवन गरड, सुनील जाधव हे नियोजन करणार आहेत. सकाळी १० वाजता गुणवंतांचा सत्कार, व्याख्याते प्रा. डॉ. ओम गजभिये मेहकर, सायंकाळी ५ वाजता वेगवेगळ्या नगरातून शहराच्या मुख्य रस्त्याने फुले- आंबेडकर वाटीकेपर्यंत मिरवणूक काढण्यात येणार आहे.
तरी या सर्व कार्यक्रमाचा समाज बांधव भगिनी तसेच जनतेने लाभ घेण्याचे आवाहन समितीचे अध्यक्ष एड. सतीशदादा गवई, उपाध्यक्ष संजय जाधव, विलास जाधव, अजय साळवे, सीमाताई मिसाळकर, राजेंद्र सुरडकर, प्रवीण भंडारे, आर एस जाधव, सुरेश अवसरमोल, विणकर बाबूजी, शाम वाघ, दत्तराव चव्हाण, राजेश खंडारे, सचिव विनोद पवार, प्रशांत भटकर, सहसचिव बीटी वानखेडे, संकेत जाधव, अभिमन्यू पवार, कोषाध्यक्ष विलास घोरपडे, सह कोषाध्यक्ष सुशीलकुमार राऊत, सदस्य विशाल खरात, श्रीकांत शिंगारे, मिलिंद माघाडे, राहुल पवार, राहुल खरात, बिपिन इंगळे, सुशील जाधव मनीष गवई किशोर बोर्डे, रवींद्र वाकोडे, राजेश बोर्डे, कुणाल तरमळे, आदित्य भुसारी, हर्षवर्धन पवार, अविनाश बोर्डे, अक्षय पवार, रत्नदीप शिनगारे, बबलू शेख, संतोष सुरडकर, प्रसिद्धीप्रमुख प्रताप मोरे, प्रशांत डोंगरदिवे, संजय निकाळजे, विनोद खरे, विजयकांत गवई, छोटू कांबळे यांच्यासह मार्गदर्शक व सल्लागार मंडळींच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!