– मोबाईलवरील वरली मटका बंद करण्याची मागणी ऐरणीवर!
सिंदखेडराजा (अनिल दराडे) – तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथे धुलीवंदनाच्या सणाला गालबोट लागले असून, येथील पोलीस मदत केंद्राजवळ आपसात हाणामारी केल्याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
प्रवीण भीवसन साळवे (वय ३२), पवन भीवसन साळवे (वय ३०), शब्बीर खान उमरखा पठाण (वय ५०), सोहेल खान शब्बीर खान पठाण (वय २३) सर्व रा. मलकापूर पांग्रा अशी आरोपींची नावे आहेत. जोरदार हाणामारी सुरू असल्याची माहिती मिळताच ठाणेदार स्वप्निल नाईक, दुय्यम ठाणेदार रविंद्र सानप यांनी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली होती. मलकापूर पांग्रा हे संवेदनशील गांव असून, मागे एका बैल व्यापार्याचा येथे खून करण्यात आला होता. गांवातील सर्व अवैध धंदे बंद करण्यात आले असून, जमादाराच्या वरदहस्तामुळे लपून छपून येथे मोबाईलव्दारे वरलीचे धंदे सुरू असल्याची कुणकुण मात्र ऐकू येत आहे. त्यामुळेच येथे देवाणघेवाणीवरून खटके उडत असल्याने कठोर कारवाईची मागणी नागरिकांत जोर धरू लागली आहे. उपरोक्त घटनेचा पुढील तपास दुय्यम ठाणेदार रविंद्र सानप हे करीत आहेत.
पेड न्यूज प्रसारित न करण्याचा ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चा निर्णय!