चिखली (तालुका प्रतिनिधी) – राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात राज्य सरकार राम जन्मभूमि अयोध्या येथे महाराष्ट्र सदन उभारणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा केली असल्याचे भारतीय जनता पक्षाचे तालुका उपाध्यक्ष अनमोल ढोरे पाटील यांनी मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री तथा चिखली मतदार संघाच्या कर्तव्यदक्ष आमदार श्वेताताई महाले पाटील यांचे आभार व्यक्त केले.
राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मंगळवारी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला असून यावेळी त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यात शेतकरी, कष्टकरी, महिला, विद्यार्थी, युवक, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक, उद्योजक, व्यापारी अशा सर्व घटकांना अर्थसंकल्पातून न्याय आणि विकासाची संधी देणारा हा अर्थसंकल्प असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. जुन्नरमध्ये शिवसंग्रहालय उभारणार, अशी घोषणा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी केली आहे. त्याच बरोबर ११ गडकिल्ल्यांना जागतिक पातळीवर जाण्यासाठी युनेस्कोला प्रस्ताव पाठवला असल्याची माहितीही अजितदादा पवार यांनी दिली आहे. याशिवाय अयोध्येत रामजन्मभूमीत महाराष्ट्र सदन उभारण्यात येणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा त्यांनी केली आहे, तसेच जम्मू काश्मीर मध्येही महाराष्ट्र भवन बांधण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या
अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांनी बरेच महत्वाचे निर्णय घेतले आहेत, त्यात प्रामुख्याने भारतातील पहिली मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे भुसंपदान पूर्ण झालेले असून सोलापूर तुळजापूर धाराशिव तेथे रेल्वे मार्गासाठी भुसंपादन सूरू असल्याची माहिती दिली. जालना, यवतमाळ, पुणे, लोणावळा रेल्वे मार्गासाठी 50 टक्के रक्कम सरकारं देणार असून सहा वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू पालघरपर्यंत 7 हजार 500 किमीची रस्त्याची कामे हातात घेण्यात येणार असून, सार्वजनिक बांधकामाद्वारे १९ हजार कोटी रुपये देण्यात येत आहे. वर्सोवा वांद्रे सागरी सेतू पालघरपर्यंत केला जाणार आहे व रत्नागिरी भागवत बंदरसाठी 300 कोटी रुपये, मिरकरवाडा बंदर नव्याने करण्यात येतं असून, सात हजार किलोमीटर लांबीचे रस्ते आणखी सुरु करणार आहेत. त्याच बरोबर पेन्शनधारकांना संजय गांधी निराधार योजनेत 1000 वरुन 1500 रुपये पेन्शन दिली जाणार आहेत व प्रत्येक तालुक्यात एक शववाहिका उपलब्ध करुन देण्यात येणार असून, संत गाडगेबाबा महामंडळ स्थापन केल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मिहान प्रकल्पासाठी 100 कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली असून सामान्य प्रशासन विभागास १ हजार कोटी रुपये प्रस्तावित आहेत. वस्त्रोद्योग धोरण अंतर्गत शिधा वाटप करताना एका महिलेस एक साडी देण्याचं काम सुरू आहे, अशी माहिती अर्थमंत्र्यांनी दिली आहे.
तसेच पाच इंडस्ट्रियल पार्क, ‘मेक इन इंडिया’साठी 196 कोटींच्या निविदा निर्यात वाढीसाठी 5 इंडस्ट्रियल पार्क तयार करण्यात येत आहेत, राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन डॉलर करण्यासाठी आवश्यक ध्येयधोरणांची अर्थसंकल्पातून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्याच बरोबर शेतकऱ्यांना 8 लाख 50 हजार नवीन कृषीपंप बसवण्यात येणार आहेत. शेळी मेंढी वराह योजनेअंतर्गत 129 प्रकल्पांचा प्रस्ताव सरकाराला देण्यात आला आहे. येत्या 3 वर्षात 155 प्रकल्पांची दुरुस्ती करण्यात येईल त्यासाठी 15 हजार कोटी रुपयांची गरज आहे व एक लाख महिलांना रोजगार, 5000 पिंक रिक्षा 40 टक्के अपारंपारिक उर्जा राबविणार आहे. 37 हजार आंगणवाडींना सौर उर्जा दिली जाणार आहे. एक लाख महिलांना रोजगार दिला जाईल. आंगणवाडी सेविकांची १४ लाख पद भरण्यात आली आहेत,४४ लाख नुकसान झालेल्या शेतकरी यांना तीन हजार कोटी रुपयांची मदत देण्यात आली असून पाच हजार पिंक रिक्षा महिलांसाठी दिल्या जाणार आहेत. तसेच मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना महिला आणि बालकल्याण विभागाला ३१०७ कोटी रुपयांची तरतूद देण्यात आली असून मुलींना १८ वर्षांपर्यंत विविध टप्प्यांमध्ये एक लाख एक हजार रुपये निधी देण्यात येणार आहे. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भरीव तरतूद खेळाडूंसाठी ‘मिशन लक्षवेध’ योजनेअंतर्गत राज्य स्तरावर उच्च कामगिरी केंद्र, विभागीय स्तरावर क्रिडा उत्कृष्टता केंद्र, जिल्हा स्तरावर क्रिडा प्रतिभा विकास केंद्र अशी खेळाडंसाठी त्रिस्तरीय प्रशिक्षण यंत्रणा उभारण्यात येणार असून आशियाई स्पर्धेत पदक मिळवणाऱ्या राज्यातील खेळाडूंच्या पारितोषिकामध्ये १० पट वाढ करण्यात आली आहे. त्याच बरोबर सुवर्णपदाकासाठी एक कोटी रुपये रौप्य पदकासाठी ७५ लाख रुपये आणि कांस्य पदकासाठी ५० लाख रुपयांची पारितोषिके देण्यात येत आहेत, असे अर्थसंकल्पीय अधिवेशनात महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे. त्याबद्दल व विशेष म्हणजे राम जन्म भूमि आयोध्या येथे महाराष्ट्रातील जनतेसाठी महाराष्ट्र सदन उभारणार असल्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व अजितदादा पवार तसेच चिखली मतदार संघाच्या कर्तव्यदक्ष आमदार श्वेताताई महाले पाटील यांचे चिखली तालुक्यातील जनतेच्या वतीने भारतीय जनता पक्षाचे तालुका उपाध्यक्ष अनमोल ढोरे पाटील यांनी आभार मानले आहे.