ChikhaliVidharbha

पत्रकार सुनील अंभोरे यांना ‘माणुसकी जीवन गौरव’ पुरस्कार जाहीर

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – माणुसकी सोशल फाउंडेशन नाशिकचा राष्ट्रीय माणुसकी जीवन गौरव पुरस्कार चिखली तालुक्यातील मेरा बु . येथील युवा सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार, चिखली तालुका विकास संघर्ष समितीचे कार्यकारी अध्यक्ष सुनील अंभोरे यांना जाहीर झाला आहे. कोरोना काळामध्ये त्यांनी अनेक गोरगरिबांना रुग्णालयामध्ये दाखल करून त्यांचे प्राण वाचवले आहे. शिवाय त्यांना अन्नधान्याची मदतसुद्धा केली आहे. कुठलीही घटना घडली तर सर्वात अगोदर ते मदतीला धावून जातात हे खास त्यांचे वैशिष्ट्य आहे, त्यांच्या या सेवाकार्याबद्दल हा पुरस्कार त्यांना जाहीर झालेला आहे.

माणुसकी सोशल फाउंडेशन नाशिकद्वारा आयोजित ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित पुरस्कार सोहळ्यामध्ये त्यांना राष्ट्रीय माणुसकी जीवन गौरव पुरस्कार २० २४ जाहीर झाला आहे . या अगोदरही त्यांना उत्कृष्ट पत्रकारितेचा पुरस्कार व विश्वशांती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे. माणुसकी सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष तथा ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब केदारे तसेच राष्ट्रीय सचिव अविनाश झोटिंग यांनी सदर पुरस्काराची घोषणा केली आहे. येत्या २६ फ्रेबुवारीला नाशिक येथे होणाऱ्या शानदार कार्यक्रमांमध्ये माजी न्यायाधीश अशोक आव्हाड. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग अध्यक्षा सौ. मंदाकिनी भोसले . कैलास पवार जिल्हा पुरवठा अधिकारी नाशिक मोहन आडागळे, पुरवठा अधिकारी निफाडकर, दैनिक सकाळचे माजी संपादक उत्तम कांबळे. आमदार एडवोकेट राहुल ढिकले . संदीप कर्णिक नाशिक पोलीस आयुक्त. मोनिका राऊत पोलीस उपायुक्त नाशिक . प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त नाशिक . एल . सोनवणे शिक्षण उपसंचालक नाशिक यांच्यासह दिग्गज मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. यापुरस्काराबद्दल जिल्हाभरातून अंभोरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!