BuldanaHead linesVidharbha

रविकांत तुपकरांच्या झंजावाताने इतर पालापाचोळा उडाला!

– मला जेलमध्ये डांबायचे होते, पण न्यायदेवतेने न्याय दिला, आता तुमची साथ द्या – रविकांत तुपकर

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या झंजावाताने लोकसभेसाठी इच्छूक असलेल्या इतर नेत्यांचा पालापाचोळा पार कुठच्या कुठे उडून गेला असून, चोहीकडे तुपकर यांची जोरदार लाट निर्माण झाली आहे. चिखली तालुक्यातील अंचरवाडी येथील जाहीरसभा तर अभूतपूर्व झाली. अंभोडा, हतेडी ग्रामस्थांनीही तुपकरांचे जोरदार स्वागत केले. दरम्यान, काल (दि.२२) तुपकर यांनी आपल्या निर्धार परिवर्तन यात्रेला खामगाव तालुक्यातील मांडका येथून प.पू. लक्ष्मणगिरी महाराजांचे दर्शन घेऊन सुरूवात केली. बुलढाणा जिल्ह्याची मागास ओळख पुसण्याच्या निर्धार आपण केला असून, त्यासाठी तुमच्या सर्वांच्या साथीची गरज, त्यामुळे या परिवर्तनाची तुम्ही मला साथ द्या जिल्ह्याचा चेहरा बदलून दाखवितो, असा निर्धार रविकांत तुपकरांनी यावेळी व्यक्त केला.

शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या मेळाव्यांना जिल्हाभरात जोरदार प्रतिसाद मिळत असून, तोच प्रतिसाद २० फेब्रुवारीरोजी बुलढाणा तालुक्यातील अंभोडा व २१ फेब्रुवारीरोजी चिखली तालुक्यातील अंचरवाडी येथे झालेल्या एल्गार परिवर्तन मेळाव्यातही बघायला मिळाला. दोन्ही ठिकाणी शेतकर्‍यांनी उत्स्फूर्त गर्दी केली होती. तर गावकर्‍यांनी तुपकरांची मिरवणूक काढून जंगी स्वागत ही केले. गेल्या २२ वर्षांपासून आपण शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, तरुण महिला व सर्वसामान्यांसाठी लढत आलो आहे. या काळात अनेक संकटे झेलावी लागली, मात्र आपण हा लढा कधीच सोडला नाही आणि यापुढेही हा लढा मोठा ताकदीने सुरूच राहील, त्यासाठी तुम्हां सर्वांच्या खंबीर साथीची आणि आशीर्वादाची आवश्यकता आहे. परिवर्तनाच्या या लढाईत तुम्ही फक्त साथ द्या, परिवर्तन घडवूनच दाखवेल, अशा भावना रविकांत तुपकरांनी या मेळाव्यांत बोलतांना व्यक्त केल्या.
अंचरवाडी येथील मेळाव्याआधी तुपकरांना न्यायालयातून मोठा दिलासा मिळाला. तुपकरांना तुरुंगात टाकण्यासाठी पोलिसांनी दाखल केलेली याचिका बुलढाणा जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावली. त्यानंतर तुपकर समर्थकांचा जल्लोष बघायला मिळाला. अंचरवाडी गावकर्‍यांनी डिजे लावत व जेसीबीने फुलं उधळत रविकांत तुपकरांचे जल्लोषात स्वागत केले. तर २० फेब्रुवारीरोजी अंभोडा येथे झालेल्या मेळाव्याआधीही गावकर्‍यांनी बैलगाडीतून मिरवणूक काढून तुपकरांचे स्वागत केले. तर बुलढाणा तालुक्यातील तांदूळवाडी, हतेडी बु. हतेडी खुर्द गावकर्‍यांनी तुपकरांची गाडी आडवून त्यांचे स्वागत केले. माझ्यावर अनेक संकटे येत आहेत, पण तुमच्या खंबीर साथीमुळे ती संकटे उधळून लावायला दुप्पट ताकद मिळत आहे. तुम्ही उधळलेले प्रत्येक फुलांच्या पाकळीमुळे लढायला नवी ऊर्जा मिळत आहे. आज जिल्ह्यात आपल्या मेळाव्यांना मिळणारा प्रतिसाद बघून अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, त्यामुळे मला तुरुंगात टाकण्याचा घाट घातला जात आहे. पण न्यायदेवते त्यांचा हा कट उधळून लावला आहे. मला कितीही त्रास देण्याचा प्रयत्न केला तरी मी माझा लढा सोडणार नाही, येणार्‍या लोकसभेत परिवर्तनाची नितांत गरज आहे. त्यासाठी तुम्ही मला साथ द्या आणि परिवर्तनाच्या लढाईत सहभागी व्हा, असे आवाहन रविकांत तुपकरांनी यावेळी बोलतांना केले. या दोन्ही मेळाव्यांना पंचक्रोशीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, काल निर्धार परिवर्तन यात्रेला मांडका येथून सुरुवात झाल्यानंतर तालुक्यातील खुटपुरी, शिरजगाव दे., मातणी, गारडगाव, अंत्रज, हिवरखेड, नायदेवी, लोखंडा, निरोड, शिराळा, गणेशपूर, नागझरी, झोडगा, वझर या गावात गावकर्‍यांनी रविकांत तुपकरांचे जोरदार स्वागत केले, यावेळी तुपकरांनी सभा व बैठकांच्या माध्यमातून गावकर्‍यांशी संवाद साधला, तर रात्री उशिरा पाळा येथे झालेल्या सभेला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, मजूर, कष्टकरी, महिला आणि तरुणांच्या हक्काचे प्रश्न घेऊन, विकासाचे प्रश्न घेऊन आपण ही यात्रा जिल्ह्यातील प्रत्येक गावात घेऊन जाणार आहोत. जिल्ह्यातील नागरिकांच्या मनात परिवर्तन आग आहे आणि त्याच परिवर्तनाचा निर्धार करण्यासाठी ही यात्रा आहे. जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकरी, तरुण अडचणीत आहेत. शेतमालाला भाव नाही, सिंचनाची सोय नाही, दुसरीकडे तरुणांसाठी रोजगार नाही. जिल्ह्यात मोठी एमआयडीसी नाही, प्रोजेक्ट नाहीत, यूपीएससी-एमपीएससी व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी चांगले अभ्यासिका नाहीत, एकंदरीत नानाविध अडचणी या जिल्ह्यात आहेत, अनेक समस्या आहेत. या सर्व समस्या आणि अडचणी घेऊन आपण निर्धार परिवर्तन यात्रा काढत आहे. लोकसभेत परिवर्तन घडवून आणण्यासाठी ही निर्धार परिवर्तन यात्रा आहे. गावभर मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहता आता ही लढाई माझी एकट्याची नसून सर्वसामान्य जनतेने त्यांच्या खांद्यावर घेतली आहे. त्यामुळे जनतेच्या आशीर्वादाने आता लोकसभेत परिवर्तन घडणारच असा विश्वासदेखील रविकांत तुपकर यांनी यावेळी व्यक्त केला. तुम्ही मला साथ द्या बुलढाणा जिल्ह्याची मागास ओळख पुसून दाखवितो, असा निर्धार ही त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी श्याम अवथळे, अनंदा अटोळे, नानाभाऊ खटके, दीपक पाटील-आढाव, श्रीकृष्ण काकडे, दीपक देशमुख, गजानन वानखेडे, उत्तम डवले, रामराव देखमुख, महेंद्र खंडारे, अशोक लांडे, श्याम सरप, समाधान कटकवार, बाबूराव कटकवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!