मेहकर (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील देऊळगाव साकरशा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन दि. २५ जानेवारी रोजी उत्साहात पार पड़ले. यामध्ये ‘काखेत लेकरू हातात झाड़नं ड़ोईवर शेणाची पाटी; कपड़ा ना लत्ता, खरकटा भत्ता, फजिती होती माय मोठी, मह्या भीमानं माय सोन्यानं भरली ओटी’ या भीमगीतासह एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्यावर.. यासह इतरही गितावर चिमुकल्यांनी मनमोहक नृत्ये सादर करत उपस्थितांची मने जिंकली. यामुळे पालकासह गावकरीदेखील भारावले होते.
स्थानिक जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत पार पड़लेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच संदीप अल्हाट हे होते. यावेळी सेवानिवृत्त शिक्षक दत्तात्रय पाचपवार, पोलीस पाटील गजानन पाचपोर, ड़ॉ. हेमराज राठी, बी. एम. राठोड, ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चे सहसंपादक तथा जेष्ठ पत्रकार बाळू वानखेड़े, शाळा समिती अध्यक्ष विठ्ठल लाड़, उपाध्यक्षा खंड़ारे ताई, सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक खोरखेड़े, केंद्रप्रमुख लामदाढे, वैद्यकीय अधिकारी ड़ॉ. शारीक, ग्रामपंचायत सदस्य रणजीत देशमुख, शे.अबरार, सौ.यशोदा नवत्रे, भिकाजी पैठणकर, अमरशेठ बेगाणी, पूर्णाईचे सचिन राठोड, गुरूकुलचे मुख्याध्यापक, जि. प.उर्दू शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक एजाज, शाळा व्यवस्थापन पदाधिकारी यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. प्राचार्य खोरखेड़े यांनी यावेळी मार्गदर्शन केले. प्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे मान्यवरांनी पूजन केले. यावेळी वर्ग एक ते चौथीच्या चिमुकल्यांनी विविध गीतांवर सुदर नृत्ये सादर करत उपस्थितांची मने जिंकली. यावेळी शाळेसाठी नेहमीच तत्परतेने काम करणारे मुख्याध्यापक गोपाल बावने यांचा सत्कारदेखील करण्यात आला. प्रास्ताविक मुख्याध्यापक गोपाल बावने, तर संचलन व आभार प्रदर्शन शिक्षक होणे यांनी केले. यशस्वीतेसाठी शिक्षक देशमुख, शिक्षक गिरी, शिक्षक होणे, गोपाल गव्हाळे यांच्यासह इतरांनी परिश्रम घेतले. दरम्यान, २३ व २४ जानेवारी रोजी श्री सरस्वती विद्यालयाचे स्नेहसंमेलनदेखील पार पड़ले. तसेच यावेळी विविध स्पर्धेत प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कारदेखील करण्यात आला.