– बोराखेड़ीचे बळीराम गीतेंना सुरक्षा शाखेत हलविले; खामगावचे नरेंद्र ठाकरे आता बुलढाणा शहराचे ठाणेदार!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – आगामी लोकसभा निवड़णूक पाहता पोलीस प्रशासनही अॅलर्ट मोड़वर दिसत असून, जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कड़ासने यांनी जिल्ह्यातील पात्र दहा पोलीस निरीक्षकांच्या प्रशासकीय कारणास्तव तात्पुरत्या स्वरूपात बदल्या केल्या आहेत. यामध्ये बोराखेड़ीचे पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांची सुरक्षा शाखा बुलढाणा तर खामगाव शहरचे पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांची बुलढाणा शहर पो.स्टे ठाणेदारपदी नियुक्ति करण्यात आली आहे.
आगामी लोकसभा निवड़णुकीच्या अनुषंगाने राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या निर्देशानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कड़ासने यांनी १५ जानेवारीरोजी एका आदेशानुसार सदर पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिनेश झांबरे यांची नियंत्रण कक्ष बुलढाणा, जिल्हा वाहतूक शाखा बुलढाणाचे आनंद महाजन यांची ठाणेदार पोलीस स्टेशन जळगाव जामोद, पोलीस स्टेशन सायबर क्राईम बुलढाणाचे सारंग नवलकर यांची ठाणेदार पोलीस स्टेशन बोराखेड़ी, बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रल्हाद काटकर यांची पोलीस स्टेशन सायबर बुलढाणा, शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अरूण परदेशी यांची जिल्हा वाहतूक शाखा बुलढाणा, तामगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रमोद उलेमाले यांची नियंत्रण कक्ष बुलढाणा, शेगाव शहराचे ठाणेदार सुनील अंबुलकर यांची श्री गजानन महाराज मंदिर सुरक्षा शेगाव तर श्री गजानन महाराज मंदिर सुरक्षा शेगावचे ठाणेदार सुरेश नाईकनवरे यांची नियंत्रण कक्ष खामगाव येथे बदली करण्यात आली आहे. याशिवाय, नियंत्रण कक्ष बुलढाणा येथील पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी हे पोलीस स्टेशन शिवाजी नगर, शेगाव ग़्रामीणचे ठाणेदार दिलीप वड़गावकर हे ठाणेदार पोलीस स्टेशन शेगाव तर पोलीस स्टेशन खामगाव शहरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप गोंड़ाणे हे शहर पोलीस स्टेशन खामगाव येथील अतिरिक्त कामकाज पुढील आदेशापर्यंत पाहतील, असेही सदर आदेशात नमूद आहे.