बुलढाणा (ब्रेकिंग महाराष्ट्र) : भाजपा बुलडाणाचे शहराध्यक्ष सिध्दार्थ शर्मा यांच्या वाढदिवसा निमित्त १३ जुलै रोजी भाजपा युवा मोर्चा तर्फे शहरातील अपंग मूक बधिर विद्यालय बुलडाणा येथे भोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. सरकारी बगीचा कलेक्टर बंगल्यासमोर वृक्षारोपण करण्यात आले. तसेच लीलावती ब्लड बँक येथे रक्तदानाचे शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये सोहम झाल्टे, आशिष व्यवहारे,शुभम कोठारी,अक्षय छाजेड, सिध्दार्थ मलिक यांच्यासह पदाधिकारी यांनी रक्तदान केले. अशा विविध सामाजिक उपक्रमाने वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी भोजन वाटप करतांना अपंग विद्यार्थ्यांसोबत सहभोजनामध्ये भाजपाचे पदाधिकारी उपस्थीत होते. सदर कार्यक्रमास भाजपा तालुका सरचिटणीस डॉ.राजेश्वर उबरांहंडे,भाजपा शहर सरचिटणीस आशिष व्यवहारे,नगरसेवक अरविंद होंडे,नितीन बेंडवाल, सचिन टेंभीकर, प्रीतेश बेदमुथा,नितीन श्रीवास,हर्षल जोशी,आसिफ भाई,भाजयुमो तालुका सरचिटणीस सतीश पाटील,भाजयुमो शहर सरचिटणीस मोहित भंडारी, नारायण तोंडीलायता, नितीन दासर, पंडितराव सपकाळ, महेश तलवारे यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (श.प्र)
Read Next
10 hours ago
संजय गायकवाड की जयश्री शेळके, डॉ. शिंगणे की मनोज कायंदे, श्वेताताई की राहुल बोंद्रे? उद्या येणार जनतेचा फैसला!
10 hours ago
त्रिशंकु विधानसभेचे संकेत पाहाता, सरकार स्थापनेसाठी ‘महायुती’, ‘महाआघाडी’कडून ‘प्लॅन ए व बी’ही तयार!
5 days ago
विरोधक ‘गद्दारी अन् खुद्दारी’वर लढत असताना ऋतुजाताईंनी मात्र शेतकरी व विकासाच्या मुद्द्यावर घेतली प्रचारात बाजी!
1 week ago
स्वकीय, राजकीय विरोधकांना शेतकर्यांची ‘वाघीण’ एकटीच भीडणार!
1 week ago
पंकजांची मनोज कायंदेंना सोडून शशिकांत खेडेकरांसाठी सभा!
Leave a Reply