Aalandi

च-होली गायत्री प्रशालेत गुरुपौर्णिमादिनी मातृपूजन

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील च-होली बुद्रुक मधील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाच्या च-होली शाखेच्या गायत्री इंटरनॅशनल स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करीत भारतीय संस्कृतीचे जतन करण्यात आले. यात पुरातन गुरु शिष्य परंपरा जोपासत आद्य गुरु माता असल्याने मातृपूजन उत्साहात करण्यात आले. यास शिक्षक, पालक, विद्यार्थी यांनी सहभागी होत कार्यक्रमाची शोभा वाढवली.
याप्रसंगी च-होली शाखेत श्री स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका सरिता विखे पाटील यांनी मुलांना गुरू पौर्णिमेच्या निमित्त गुरू पौर्णिमेचे महत्त्व सांगितले. या वेळी गुरू पौर्णिमेच्या निमित्त गुरू पूजन उत्साहात झाले. यासाठी मंगल मुहूर्तावर गुरूपूजन मातृपूजन करण्यात आले. यावेळी शालेय मुलांचे पालक, महिला पालक उपस्थित होते. मातृपुजनास मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी अगदी लहानग्यासह कुमार मुलासह मुलींपर्यंत सर्वांनी मातृ पूजन करीत गुरुपुजन केले. यातून गुरूप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी उपस्थित सर्व शिक्षकांचा गुलाब पुष्प देवून शालेय मुलांनी गुरूपुजन केले. गुरूप्रती आदर व्यक्त करीत मुलांनी आनंद द्विगुणित केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!